MLA Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Political News : माजी सहकारमंत्र्यांच्या 'कराड उत्तर'मधील जनतेचे पाण्यासाठी 'माण'च्या आमदारांना साकडे..

MLA Jaykumar Gore : शामगावच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय ग्रामस्थ आमदार जयकुमार गोरेंच्या भेटीला.

सरकारनामा ब्यूरो

- अमोल सुतार

Karad Political News : राज्याचे माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर मतदारसंघातील शामगाव येथील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी पाण्यासाठी माण मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांची भेट घेतली. 'कराड उत्तर'मधील जनतेने पाण्यासाठी 'माण'च्या आमदारांना साकडे घातल्याने माजी सहकारमंत्री व कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केले की काय ? असा सवाल जनतेत उपस्थित होत आहे.

माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील शामगाव येथील ग्रामस्थांनी नोव्हेंबर महिन्यात शेतीच्या पाण्यासाठी उपोषण केले होते. त्यावेळी आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे तसेच टेंभू उपसा जलसिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे रेड्डी आर. यांनी भेट देवून येत्या चार महिन्‍यांत हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.

त्यासंदर्भात गावातील सर्वपक्षीय स्थानिक नेते तसेच ग्रामस्थांनी आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. पंचायत समितीचे माजी सदस्य भीमराव डांगे, तुकाराम पोळ, विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष महादेव पोळ, भाजपचे मुरलीधर पोळ, शंकर पोळ, ग्रामपंचायत सदस्य अशोक सूर्यवंशी, बंडा पोळ,

मानसिंगराव पोळ, महेंद्र जाधव, शिवराज पोळ, जगदीश लावंड, विलास पोळ, बापूराव पोळ, भीमराव डांगे, शंकर पोळ, विलास पोळ, बंडा पोळ यांनी आदींनी आमदार गोरे यांची भेट घेऊन त्यांचे आभारही मानले. यावेळी आमदार गोरे म्हणाले, आमच्या मतदारसंघातील काही गावे पाण्यापासून वंचित आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यांचा पाठपुरावा युद्धपातळीवर सुरू असून, सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. तुमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जास्त दिवस लागणार नाहीत तुम्हाला पाणी मिळणारच आहे. यावेळी इतर प्रश्नाबाबतही आमदार गोरे यांनी सकारात्मक चर्चा केली.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT