Solapur DCC Bank Election Leaders Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : दिग्गजांनी खेळला ‘सेफ गेम’; डीसीसी बॅंकेतील दुसऱ्या पिढीच्या एन्ट्रीसाठी आखली जोरदार स्ट्रॅटेजी...

Second generation leaders in Solapur DCC Bank election : गोकुळच्या विजयानंतर सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. माजी संचालकांच्या पात्रतेबाबत संभ्रम असल्याने अनेकांनी स्वतःसह कुटुंबातील नव्या चेहऱ्यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव करून घेतले आहेत.

प्रमोद बोडके

Solapur, 22 October : गोकुळ जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीतील काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या विजयाचे कौतुक अजूनही सुरुच आहे. गोकुळचा गुलाल झाला, सोलापूर डीसीसीचा गुलाल केंव्हा?, असा प्रश्‍न आपसुकच विचारला जाऊ लागला आहे. साधारणतः सोमवारपासून (ता. २६ ऑक्टोबर) जिल्हा बँकेची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत माजी संचालकांना निवडणूक लढता येणार का? या प्रश्‍नाचे ठोस उत्तर सध्या तरी कोणाकडेच नसल्याने उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. सेफ गेम म्हणून बहुतांश माजी संचालकांनी स्वत:सह घरातील नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे.

बँकेच्या १९ संचालकांपैकी ११ संचालक त्या त्या तालुक्याच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून निवडून येतात. बॅंकेसाठीची खऱ्या व महत्वपूर्ण लढती याच मतदारसंघातील मानल्या जातात. या मतदारसंघातून संचालक होण्यासाठी माजी संचालकांनी स्वत:सह घरातील नव्या चेहऱ्यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून ठराव करून घेतले आहेत.

हे ठराव घेण्यामागे रिझर्व्ह बॅंकेच्या १० वर्षे नियमांचा धसकाही असू शकतो, अशी चर्चा असे ठराव घेण्यामागे असू शकते, अशी रंगली आहे. अक्कलकोटमधून आमदार सचिन कल्याणशेट्टी व बार्शीतून आमदार राजेंद्र राऊत यांचे ठराव झाले आहेत. या तालुक्यातून त्यांच्या स्पर्धकांकडे निवडणूक लढविण्यासाठी पात्र सोसायटीच नसल्याने आमदार राऊत व आमदार कल्याणशेट्टी यांची पहिल्यांदाच डीसीसीत एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

‘आम्ही नाही तर आमची नवी पिढी’ हे सुत्र पुढे येण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील काय भूमिका घेणार? यावर या निवडणुकीची चुरस अवलंबून दिसते.

----

बँकेकडे थकीत नसलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील ठराव झालेले प्रमुख नेते

अक्कलकोट : सचिन कल्याणशेट्टी (हन्नूर)

---

उत्तर सोलापूर : दिलीप माने (तिऱ्हे), धनंजय भोसले (पृथ्वीराज माने सोसायटी, तिऱ्हे), डॉ. पृथ्वीराज माने (सिद्धनाथ सोसायटी तिऱ्हे)

---

करमाळा : जयवंतराव जगताप (निलज), शंभूराजे जगताप (घरतवाडी), रश्‍मी बागल (रामवाडी), सुजीत बागल (मांगी)

---

दक्षिण सोलापूर : सुरेश हसापुरे (प्रतापसिंह मोहिते-पाटील सोसायटी, होटगी स्टेशन), भारती शिवदारे (इंगळगी), सुदर्शन हसापुरे (विजयसिंह मोहिते-पाटील सोसायटी, तिल्लेहाळ), स्वप्निल हसापुरे (विजयसिंह मोहिते-पाटील सोसायटी निंबर्गी), श्रीदीप हसापुरे (बोळकवठे)

पंढरपूर : प्रशांत परिचारक (खर्डी नं. २ व गोपाळपूर), वसंतराव देशमुख (कासेगाव), उमेश परिचारक (बोहाळी), प्रणव परिचारक (सुधाकरपंत परिचारक सोसायटी शेगाव दुमाला), दिपक पवार (वसुंधरा सोसायटी जैनवाडी), कल्याणराव काळे (वाडीकुरोली)

---

बार्शी : राजेंद्र राऊत (जामगाव आ.), रणवीर राऊत (साकत)

---

मंगळवेढा : बबनराव आवताडे (मल्लेवाडी), पूनम आवताडे (उचेठाण), सुनंदा आवताडे (मुंढेवाडी), शैलेश आवताडे (सिद्धनाथ सोसायटी, बठाण), सिद्धेश्‍वर आवताडे (हिवरगाव)

---

माढा : बबनराव शिंदे (बादलेवाडी), संजयमामा शिंदे (कै. विठ्ठलराव शिंदे सोसायटी चिंचगाव), भारत शिंदे (अरण), वैभव कुटे (टेंभुर्णी नं. २), यशवंत शिंदे (निमगाव टें.), रणजित शिंदे (बबनराव शिंदे सोसायटी निमगाव टें.), गणपतराव साठे (माढा बृहत), संजय कोकाटे (माळेगाव), सिंधू पाटील (वरवडे).

माळशिरस : विजयसिंह मोहिते-पाटील (अकलूज), रणजितसिंह मोहिते-पाटील (फोंडशिरस), डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील (गिरझणी), केशवराव पाटील (निमगाव), अर्जूनसिंह मोहिते-पाटील (मांडवे), वैष्णवीदेवी मोहिते-पाटील (शंकरनगर), शहाजीराव देशमुख (समाजभूषण नानासाहेब देशमुख सोसायटी नातेपुते).

---

मोहोळ : राजन पाटील (कोंबडवाडी), विक्रांत पाटील (अनगर), अजिंक्यराणा पाटील (कुरणवाडी)

---

सांगोला : डॉ. बाबासाहेब देशमुख (अजनाळे), दीपक साळुंखे (जवळा), संभाजी आलदर (कोळे), अतुल पवार (मेथवडे), चेतनसिंह केदार (वासूद).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT