Amar Patil- UttamPrakash Khandare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : माजी मंत्री, माजी आमदार अन्‌ जिल्हाप्रमुखांनी सोडली ठाकरेंची साथ; शिंदेंच्या सेनेचे शिवधनुष्य घेणार हाती!

Shivsena Thackeray Group's Leader join Shinde Sena : पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक माजी मंत्री, एक माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख शिंदे यांच्या गळाला लागले आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 March : एक वेळ राज्यमंत्री, दोनवेळा आमदार, सहसंपर्क प्रमुख अशी पदे भोगणारे माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, दक्षिण सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे जिल्हाप्रमुख अमर पाटील ह्या तीन नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोकणानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ‘ऑपरेशन टायगर’ मोहिम सुरू झाली आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळविला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील एक माजी मंत्री, एक माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख शिंदे यांच्या गळाला लागले आहेत.

माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे (UttamPrakash Khandare ) हे 1995 मध्ये सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये मंत्री होते. त्यांना पक्षाने तीनवेळा आमदारही केले आहे. तसेच, शिवसेनेत त्यांना सहसंपर्कप्रमुख ही पदे देण्यात आली होती. माजी मंत्री खंदारे यांच्यासाठी शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी हे नान्नजमध्ये आले होते. त्यांना पक्षाकडून पूर्वीच्या उत्तर सोलापूर मतदारसंघातून अनेकदा विधानसभा निवडणुकीत संधी देण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणात संधी मिळूनही उत्तमप्रकाश खंदारे यांनी पक्ष सोडणे धक्कादायक मानले जात आहे. विशेषतः मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना भाजपकडून उमेदवारीची ऑफर होती. मात्र, ती नाकारून त्यांनी शिवसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पक्ष आणि नेतृत्व संकटात असताना उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय खंदारे यांनी घेतल्याने त्याची चर्चा रंगली आहे.

माजी आमदार रतिकांत पाटील यांनाही शिवसेनेकडून आमदारपदी काम करण्याची संधी मिळाली होती. मात्र, २००९ च्या निवडणुकीत त्यांचा दिलीप माने यांच्याकडून पराभव झाला होता, तेव्हापासून ते मुख्य राजकीय प्रवाहातून काहीसे बाहेर फेकले गेले होते.

ज्यांच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांच्या नेत्यांशी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दोन हात केले, त्या अमर पाटील यांनीही ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय सर्वात धक्कादायक मानला जात आहे. अमर पाटील यांच्यासाठी मतदारसंघ खेचून आणण्यापासून उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्यासाठी प्रचार सभा घेतली होती. त्यामुळे पाटील यांचा निर्णय ठाकरे यांच्यासाठी नक्कीच क्लेषदायक असणार आहे.

दोघांची हकालपट्टी

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, अमर पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने याबाबतीचे आदेश पक्षाकडून काढण्यात आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT