Budget Session : मुनगंटीवारांच्या मनातील खंत बाहेर आलीच; म्हणाले ‘चुकून मीही काही वर्षे मंत्री होतो’, विधानसभेत रंगली जुगलबंदी

Sudhir Mungantiwar Regret : आशिष शेलार म्हणाले, मी सुधीरभाऊंच्या प्रश्नाला कधीच क्रॉस करणार नाही. पण, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. त्यावर सुधीरभाऊंनी ठीक आहे, काढून टाका. पण धानउत्पादकांवर अन्याय होऊ देऊ नका, अशी विनंती केली.
Nana Patole-Ashish Shelar-Sudhir Mungantiwar
Nana Patole-Ashish Shelar-Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 06 March : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीबाबत विधानसभेत पोटतिडकीने बोलणारे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलता बोलता ‘मीही चुकून मंत्री होतो’ असे विधान केले. त्यावरून विधानसभेत एकमेकांना टोले आणि चिमटे काढण्यात आले. सुधीरभाऊंच्या त्या विधानावर सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार यांनी आक्षेप घेत ‘ते चुकून मंत्री नव्हते, तर मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते, त्याचा आम्हाला अभिमान होता, असे म्हणत ते विधान कामकाजातून काढण्याची मागणी केली. या संधीवर शांत बसतील ते विरोधक कसले. नाना पटोले यांनी उभे राहत ‘सुधीरभाऊ चुकून मंत्री झाले होते, आता चुकून बाहेर राहिलेत’ असे म्हणत एकाच वेळी मुनगंटीवार आणि भाजपला चारीमुंड्या चीत करण्याचा प्रयत्न केला.

धानावर मागील हंगामात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन कमी झाले. त्यांना भरपाई देण्याची मागणी मुनगंटीवार यांनी प्रश्नोत्तरोच्या तासात केली होती. हा प्रश्न मांडताना माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) प्रचंड संतापले होते. सोयाबीन उत्पादकाप्रमाणे धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी.

जो अधिकारी विरोधात अहवाल तयार करतो, त्याच्या ताटात यापुढे भात कधीच देणार नाही. त्याला पाहिजे असेल तर आम्ही माती गोट्याला लसणाची फोडणी करून खाऊ घालू. पण, शेतकऱ्यांच्या विरोधात वागणाऱ्या अधिकाऱ्याला आम्ही माफ करणार नाही. लाखो रुपये पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या अर्जाचा निपटारा करायचा नाही, अशा मंत्रालयातील आधुनिक वाल्मीक कराड (Walmik Karad) शोधला पाहिजे, असा हल्लाबोल त्यांनी प्रशासनावर केला.

शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत विमा कंपनीकडे तक्रार केलेली नाही, त्यामुळे या शेतकऱ्यांना पीकविमा मिळणार नाही. पीकविमा एक रुपयात द्या किंवा दहा पैशात द्या नाही तर जुन्या काळातील एक तांब्याच्या पैशात द्या. त्याचा काही संबंध पीकविम्यात येत नाही. पुढे ते मंत्र्यांना उद्देशून तुम्ही खूप बुद्धीमान आहात, वकिल आहात. असं का वागता? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

Nana Patole-Ashish Shelar-Sudhir Mungantiwar
Santosh Deshmukh Murder Case : बीड हत्या प्रकरणात मोठी अपडेट; केज कोर्टाकडे केस वर्ग, सुनावणी होणार लाईव्ह?

ते पुढे म्हणाले, चुकीने मीही काही वर्षे मंत्री होतो, मलाही थोडसं समजतं. मी नुकसान भरपाईबाबतचे परिपत्रक तुम्हालाही देतो (मंत्र्यांना उद्देशून), त्यांनाही (विधानसभा अध्यक्षांना) देतो. ते वकिल आहे, तुम्हीही वकिल आहात. मी रजिस्टर केलेले नाही, पण एलएलबी आहे. नुकसान भरपाईच्या मदतीसाठी प्रशासनाने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करावा, असे परिपत्रकामध्ये म्हटलेले आहे.

तेवढ्यात मंत्री आशिष शेलार हे बोलायले उठले. विधानसभा अध्यक्षांनी त्यांना प्रश्नावर हरकत आहे, असा सवाल केला. त्यावर सुधीरभाऊ यांनी, आशिषजी, मी मंत्र्यांना विचारत नाही. तुम्ही एक वकिल आहात, असं का करता, अस सवाल केला

आशिष शेलार म्हणाले, मी सुधीरभाऊंच्या प्रश्नाला कधीच क्रॉस करणार नाही. पण, रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये. सुधीरभाऊ असं म्हणाले की, मी चुकून मंत्री होतो. तर ते चुकून मंत्री नव्हते. ते मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते. ते जनतेने ठरवून मंत्री होते, ते आमचे मंत्री होते. त्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यामुळे तेवढं वाक्य काढून टाका, अशी विनंती केली.

Nana Patole-Ashish Shelar-Sudhir Mungantiwar
RSS on Marathi : "मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही"; संघाच्या वरिष्ठ नेत्याच्या वक्तव्याने वाद उफाळणार?

त्यावर सुधीरभाऊंनी ठीक आहे, काढून टाका. पण धानउत्पादकांवर अन्याय होऊ देऊ नका, अशी विनंती केली. त्यावर विरोधी पक्षातील नाना पटोले यांनी संधी साधत ‘सुधीरभाऊ चुकून मंत्री झाले, आता चुकून बाहेर राहिले,’ असे म्हणत मुनगंटीवार यांच्या जखमेवर (त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही) मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी कोटी करत ‘आता ही चर्चा मी चुकून घडवून आणली,’ असे वाटायला देऊ नका, असे म्हणत कामकाज पुढे नेण्याची विनंती केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com