Dharmaraj Kadadi | Dilip Mane  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dilip Mane : भाजप प्रवेशाची चर्चा रंगलेले माजी आमदार माने अखेर काडादींच्या प्रचारात उतरले...

Solapur South Assembly constituency: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारीची अपेक्षा असलेले दिलीप माने यांना अखेरपर्यंत काँग्रेसचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला होता.

Vijaykumar Dudhale

Solapur, 13 November : सोलापूर दक्षिणच्या रणांगणातून नाट्यमयरित्या माघार घ्यावी लागलेले माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, माने हे अखेर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या प्रचारात उतरले आहेत, त्यामुळे काडादी यांच्या उमेदवारीला मोठे बळ मिळाले असून सोलापुरात विधानसभा निवडणुकीत ‘सांगली पॅटर्न’ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बळावली आहे.

सोलापूर दक्षिण मतदारसंघातून (Solapur South Constituency) महाविकास आघाडीच्या उमेदवारीची अपेक्षा असलेले दिलीप माने यांना अखेरपर्यंत काँग्रेसचा एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा लागला होता. मात्र, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या विनंतीनंतर माने यांना नाट्यमयरित्या ‘दक्षिण’च्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली होती. त्यामुळे दुखावलेले माने हे भाजपच्या जवळ जातील, अशी होती.

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात मंगळवारी (ता. 12 नोव्हेंबर) होम मैदानावर सभा झाली. त्या सभेत माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा आदल्या दिवशी सोमवारी दिवसभर सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चवीने चर्चिली जात होती, त्यासाठी माने यांना काँग्रेसकडून मिळालेल्या वागणुकीचा दाखलाही देण्यात येत होता.

काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेले दिलीप माने यांच्यासाठी एबी फॉर्मही आला होता. मात्र, महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही तो त्यांना दिला नाही, असे म्हटले होते, त्यामुळे नाराज झालेल्या दिलीप मानेंचा गट भाजपसोबत जातो की काय अशी चर्चा सोलापुरात सुरू होती.

त्यातच दिलीप माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याची भेट घेतल्याचेही सांगितले जात होते. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नव्हता. त्यामुळे माने हे भाजपसोबत जाणार की काय, असे वातावरण मोदींच्या सभेच्या आदल्या दिवशी सोलापुरात तयार झाले होते.

माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपची प्रवेशाची चर्चा निष्फळ ठरवत दक्षिण सोलापूरमधील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात मंगळवारी झालेल्या काडादींच्या प्रचार सभेत माजी आमदार माने हे सहभागी झाले होते, त्यामुळे भाजप प्रवेशाचे सभोवताली जमलेले जळमट दूर करत माने हे काडादींना आमदार करण्यासाठी दक्षिण सोलापूरच्या मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस पक्षाकडून इच्छूक असलेले दिलीप माने यांना विधानसभेच्या मैदानातून माघार घ्यावी लागली आहे. ते अपक्ष निवडणूक लढविणारे धर्मराज काडादी यांच्या प्रचारात उतरले आहेत, त्यामुळे सांगली लोकसभेप्रमाणे सोलापुरात ‘सांगली पॅटर्न’ची यशस्वी पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT