Nawab Malik : माझ्यामुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या, त्यातून जामीन रद्दचे कटकारस्थान रचले; मलिकांचा रोख कोणाकडे?

Maharashtra Assembly Election 2024: मी आणि माझी मुलगी निवडणूक लढवत आहोत. ज्या प्रकारचे वातावरण दोन्ही मतदारसंघात निर्माण झालेले आहे. जे आमचे स्नेही, मित्र असतील, त्यांना वाटत असेल की माझा जामीन रद्द झाला पाहिजे, त्यासाठी कोर्टात हा अर्ज करण्यात आलेला आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 13 November : राजकीय व्यक्ती असल्याने निवडणूक लढविणे आणि माझे राजकीय विचार मांडण्याचा मला पूर्ण अधिकार असून न्यायालयाने त्याच्यावर कुठेही निर्बंध लावलेले नाहीत. मी ज्या विषयांवर बोलतोय, ते काही लोकांना खटकत असेल. तसेच माझ्या बोलण्यामुळे, माझे विचार मांडत असताना किंवा निवडणूक लढवत असल्यामुळे बऱ्याच लोकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे माझा जामीन अर्ज रद्द करण्याचे हे कटकारस्थान रचण्यात आलेले आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

जामीन अर्जावर कारागृहाच्या बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) हे शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नवाब मलिक हे जामिनाचा दुरुपयोग करत आहेत, त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज रद्द करण्यात यावा, यासाठी ईडीने त्यांच्याविरोधात न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर मलिक बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, मला सुरुवातील जामीन मिळाला, तेव्हा माध्यमांशी संवाद साधण्यास बंदी होती. पण, शेवटी जमीन देताना अटी व शर्ती निश्चित झाल्या आहेत, माझ्या विरोधातील प्रकरण सोडता इतर कुठल्याही प्रकारचे निर्बंध माझ्यावर नाहीत. राजकीय व्यक्ती असल्याने निवडणूक लढवणे आणि माझे राजकीय विचार मांडण्याचा मला पूर्ण अधिकार असून कोर्टाने (Court) त्यांच्यावर निर्बंध लावलेले नाहीत.

माध्यमांमध्ये ज्या बातम्या येतात किंवा वेगवेगळ्या विषयावर मी बोलतोय, हे काही लोकांना खटकत असेल. ही व्यक्ती राजकारणातून संपून गेलेला आहे. पहिले मी एका ठिकाणी आमदार होतो. आता दोन ठिकाणी आम्ही लढत आहोत. मी आणि माझी मुलगी निवडणूक लढवत आहोत.

Nawab Malik
PM Modi Solapur Tour : ‘महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे महायुतीचा ट्रॅक रेकॉर्ड Vs महाआघाडीचा खोटा ट्रॅप रेकॉर्ड’

ज्या प्रकारचे वातावरण दोन्ही मतदारसंघात निर्माण झालेले आहे. जे आमचे स्नेही, मित्र असतील, त्यांना वाटत असेल की माझा जामीन रद्द झाला पाहिजे, त्यासाठी कोर्टात हा अर्ज करण्यात आलेला आहे. आमची कायदेशीर टीम त्यावर काम करेल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

सध्या जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझ्या बोलण्याने, माझे विचार मांडत असताना किंवा निवडणूक लढवत असल्यामुळे बऱ्याच लोकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे हे कटकारस्थान रचण्यात आलेले आहे, असा आरोपही मलिक यांनी केला.

मी चांदिवाल अहवाल वाचलेला नाही

चांदिवाल आयोगाने आपला अहवाल सादर केला. तो अहवाल पटलावर ठेवायचा की नाही, कधी ठेवायचा हा सरकारचा अधिकार आहे. माझ्यावरही वाझे यांनी आरोप केले होते. मी माझी बाजू मांडली आहे. न्यायमूर्ती चांदिवाल यांनी माझे म्हणणे ऐकून घेऊन मला क्लिनचिट दिली आहे. मी अहवाल वाचलेला नाही. त्यात काय आहे हे चांदिवाल आयोगालाच महिती असेल किंवा ज्यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आलेला आहे, त्या मंत्र्यांना त्यात काय आहे, हे माहिती असेल, अशी प्रतिक्रिया नबाव मलिक यांनी चांदिवाल आयोगाच्या अहवालावर नोंदविली.

Nawab Malik
Pandharpur Politic's : पंढरपुरात परिचारक, भालकेंना धक्का; सहा नगरसेवकांचा पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा

शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय भुजबळांचा

छगन भुजबळ हे शिवसेनेचे नेते होते. मंडल आयोगाच्या विषयावर शिवसेना आणि भुजबळ यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्या वेळी शरद पवार हे मुख्यमंत्री होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी शिवसेनेत न राहण्याची भूमिका भुजबळ यांनी घेतली होती. त्यामुळे भुजबळ यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता, असे मत मलिक यांनी भुजबळांच्या दाव्यावर व्यक्त केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com