Solapur Politic's : सांगलीप्रमाणे ‘सोलापूर दक्षिण’मध्ये धाडस कराल तर अवघड जाईल; शिवसेनेचा काँग्रेसला धमकीवजा इशारा

Assembly Election 2024 : आम्ही प्रणिती शिंदे यांना जीवाचं रान करून आघाडीधर्म पाळून खासदार केलेले आहे. आम्ही आघाडी धर्म पाळलेला आहे, मग तुम्ही का पाळू शकत नाही, असा सवाल कोळी यांनी काँग्रेस नेत्यांना विचारला आहे.

Sharad Koli-Amar Patil-Dilip Mane
Sharad Koli-Amar Patil-Dilip ManeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 October : सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघावरून महाविकास आघाडीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे-काँग्रेस पक्षात आता सोलापुरात वाद पेटला आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले माजी आमदार दिलीप माने यांनी बंडखोरीचे संकेत दिले होते.

त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्याच पद्धतीने उत्तर देत काँग्रेसने सोलापूर दक्षिणवरील दावा न सोडल्यास अक्कलकोट आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघात शिवसेना बंडखोरी करेल, असा इशारा दिला आहे. तसेच, सांगलीप्रमाणे दबाव आणण्याचा प्रयत्न कराल ते काँग्रेसला अवघड जाईल, असेही म्हटले आहे.

महाविकास आघाडीत सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघ (Solapur City South Constituency) शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला गेला आहे. त्या मतदारसंघातून शिवसेनेने अमर पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते येत्या ता. 29 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

तत्पूर्वी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी शुक्रवारी सायंकाळी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना बंडखोरी करण्याचे संकेत दिले होते. माझे अकरा भाऊ आहेत, त्यामुळे अकरा मतदारसंघात कुठे कुठे बंडखोरी होते, ते पाहा, असे म्हटले होते. त्याला शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे.

शरद कोळी म्हणाले, महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारी अमर पाटील यांना जाहीर झाली आहे. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मही मिळालेला आहे. महाविकास आघाडीतील सर्व प्रमख नेत्यांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा निर्णय झालेला आहे. पण मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांची मने आपल्या नेत्याला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे दुखावली आहेत. हे होणे साहजिक आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांची नाराजी दूर करतील.


Sharad Koli-Amar Patil-Dilip Mane
Pandharpur Politic's : बावनकुळे मिटविणार आवताडे-परिचारक वाद; फडणवीसांप्रमाणे शिष्टाई यशस्वी ठरणार?

काही काँग्रेस नेत्यांनी दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढविण्याचा हट्टा धरला आहे. पण महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे वागू नका. आमची इच्छा एकत्र लढण्याचीच आहे. आम्ही प्रणिती शिंदे यांना जीवाचं रान करून आघाडीधर्म पाळून खासदार केलेले आहे. आम्ही आघाडी धर्म पाळलेला आहे, मग तुम्ही का पाळू शकत नाही, असा सवाल कोळी यांनी काँग्रेस नेत्यांना विचारला आहे.

सोलापूर दक्षिणमधून निवडणूक लढविण्याचा तुमचा हट्ट असेल, तर त्याचे परिणाम तुम्हालाही भागावे लागतील. आम्हीही सोलापूर शहर मध्य आणि अक्कलकोटमधून शिवसेनेचा उमेदवार देऊ. तुम्ही सांगलीला जो दबाव आणण्यााचा प्रयत्न केला आहे, तसा दबाव सोलापुरात आणू नका. ते काँग्रेसला अवघड जाईल, असा खणखणीत इशाराही शिवसेना उपनेत्याने दिला आहे.


Sharad Koli-Amar Patil-Dilip Mane
Congress Lok Sabha Candidate List : चंद्रपूरचा तिढा कायम; काँग्रेसच्या चौथ्या यादीत राज्यातील 'या' चार जणांची नावे जाहीर

येत्या 29 तारखेला शिवसेनेकडून महाविकास आघाडीचे उमेदवार अमर पाटील हे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या पाधिकाऱ्यांना आघडीचा धर्म पाळायला सांंगावे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी अमर पाटील यांचा अर्ज भरायला यावे, असे आवाहनही कोळी यांनी केले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com