Dhangar Reservation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhangar Reservation : धनगर समाजाला फसवण्याचं पाप प्रत्येक सरकारने केलं ; माजी आमदार नारायण मुंडे चौंडीत बरसले

Narayan Munde News : आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास त्याची किमत सरकारला चुकवावी लागले.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : धनगर समाजाने अनुसूचित जमाती आरक्षणासाठी चौंडी (ता. जामखेड) येथे आक्रमकपणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा वाढत आहे. माजी आमदार नारायण मुंडे यांनी शनिवारी आंदोलनस्थळी येत भेट दिली. माजी आमदार मुंडे यांनी यावेळी सरकारवर तोंडसुख घेतले.

माजी आमदार नारायण मुंडे (Narayan Munde) म्हणाले, धनगर समाज अनुसूचित जमाती आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करीत असूनही प्रत्येक सरकाराने या समाजाला फसविण्याचे पाप केले. आता राज्यकर्त्यांनी धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास त्याची किमत सरकारला चुकवावी लागले. फसवणूक, तर बिलकूल खपवून घेणार नाही, असाही इशारा माजी आमदार मुंडे यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी दिलेल्या 50 दिवसांची मुदत संपल्यानंतर यशवंत सेनेने चौंडी येथे दुसर्‍यांदा सुरु केलेल्या उपोषणस्थळी आज धनगर(Dhangar) बांधवांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.

उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले, सुरेश बंडगर, यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील, प्रदेश मुख्य सचिव नितीन धायगुडे, स्वप्नील मेमाणे, अँड विक्रमसिंह पाटील, किरण धालपे, बाळा गायके, परमेश्वर वाघमोडे(माजलगाव), राजेंद्र थोरात(हिंगणगाव,ता.हवेली), मंगल दांगडे पाटील, अवधूत दांगडे पाटील(बारामती) यांसह विविध तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती मुर्मूंची भेट...

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा (Reservation) प्रश्न राज्यात पेटला आहे. आरक्षणावरून दररोज आरोप-प्रत्यारोप आणि दोन समाजांमध्ये संघर्ष निर्माण होऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली आहे. मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये खासदार सर्वश्री संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, राजन विचारे, संजय जाधव, प्रियंका चर्तुवेदी, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, तसेच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, माजी मंत्री अनिल परब, पक्ष प्रतोद सुनील प्रभू आदींचा समावेश होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT