Narayan Kuche : आमदार कुचेंसमोरच भाजप कार्यकर्ते अन् मराठा आंदोलक भिडले!

Maratha Reservation:आंदोलकांनी कुचेंच्या विरोधात घोषणा दिल्या
Narayan Kuche
Narayan KucheSarkarnama
Published on
Updated on

Jalna : मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलकांच्या भावना अद्यापही तीव्र आहेत. पुढाऱ्यांना गावबंदी केल्यानंतरही बस स्थानकाच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या भाजप आमदाराला मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या गावबंदीच्या निर्णयाला बगल देत भारतीय जनता पार्टीचे बदनापूर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते बस स्थानकाच्या कामाचे उद्घाटन होते. या कार्यक्रमाला विरोध करीत मराठा समाजातील आंदोलकांनी कुचेंच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांचा निषेध व्यक्त केला.

कार्यक्रमाला उपस्थित असलेले भाजपचे कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद टळला आहे. मात्र, या वेळी मराठा समाजाकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आंदोलक आणि कुचेंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ परिसरात तणाव होता. या तणावामुळे काही वेळ संभाजीनगर-जालना महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narayan Kuche
Maratha Reservation : विद्यार्थ्यानं चक्क उत्तरपत्रिकेत लिहिलं 'एक मराठा कोटी मराठा'

गजानन हरणे यांचे उपोषण मागे

मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अकोला येथे अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या गजानन हरणे यांनीही आपलं उपोषण मागं घेतलं आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास अकोल्यात पुन्हा तीव्र लढा उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. अन्नत्याग आंदोलन मागं घेतलं असलं तरी जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाऊन मराठा आरक्षण जनजागृती अभियान २ जानेवारीपर्यंत राबविण्याचा मानस हरणे यांनी व्यक्त केला.

Narayan Kuche
Dr. Chitra Kurhe : एका चुकीमुळं फॉरेन रिटर्न महिलेनं सरपंचपद गमावलं!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com