Solapur, 13 November : माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले शिवशरण बिराजदार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमर पाटील यांना फायदा होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सोलापुरातून जाता जाता भाजपला धक्का दिला असून माजी आमदाराला स्वगृही आणण्यात यश मिळविले.
शिवशरण बिराजदार हे पूर्वी शिवसेनेत (Shivsena) होते. त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर सोलापूर शहर दक्षिण या जुन्या मतदारसंघातून निवडणूक लढून जिंकली होती. त्यानंतरच पुढच्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. तत्पूर्वी त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक म्हणूनही सोलापूर महानगरपालिकेत काम केले होते.
दरम्यान, मागील 2019 च्या निवडणुकीत माजी आमदार शिवशरण बिराजदार (Shiv Sharan Birajdar) यांनी शिवसेना सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, त्यामुळे शिवसेनेला तो धक्का होता. मात्र, पाच वर्षे भाजपसोबत काढल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सोलापूरमध्ये आल्यानंतर आज सकाळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केले. हाती शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांनी बिराजदार यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
दरम्यान, सोलापूर महापालिकेत शिवसेनेचे माजी नगरसेवक, त्यानंतर सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून ते आमदार झाले होते. दुसऱ्यांदा मात्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील निवडणुकीतही त्यांना पराभवाला समोरे जावे लागले होते. त्यांच्या भावजय मात्र भाजपच्या माजी नगरसेविका आहेत.
शिवसेना प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना माजी आमदार शिवशरण बिराजदार म्हणाले, मी माझ्या घरी परत आलो आहे, त्याचा मला खूप आनंद होत आहे. मी शिवसेनेच्या बाहेर होतो, त्यामुळे मला चुकल्यासारखं वाटत होतं. भाजपसोबत गेल्यानंतर कुठे गेलो आणि काय गेलो, असे वाटत होते.
पण असो उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आता शिवसेनेचे बंधन बांधून घेतले आहे. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या गळ्यात ताईत घातलं होतं. आता उद्धव ठाकरे यांनी माझ्या हातात भगवे शिवबंधन बांधले आहे. मी या भगव्याचा पाईक म्हणून सोलापूरची सेवा करत राहीन, असा शब्दच त्यांनी माध्यमांसमोर बोलताना दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.