Pandharpur Politic's : पंढरपुरात परिचारक, भालकेंना धक्का; सहा नगरसेवकांचा पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा

Assembly Election 2024 : भालके आणि परिचारक समर्थक सहा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा देत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
Bhagirath Bhalke- Prashant Paricharak
Bhagirath Bhalke- Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 November : विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आलेले असतानाच पंढरपूर मतदारसंघात माजी आमदार प्रशांत परिचारक आणि काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना मोठा धक्का बसला आहे. भालके आणि परिचारक समर्थक सहा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांना पाठिंबा देत पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या माजी नगरसेवकांचे स्वागत केले आहे.

पंढरपूर मतदारसंघात (Pandharpur Constituency) चौरंगी लढत होत असून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडून दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत, तर काँग्रेसकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके हे निवडणूक लढवीत आहेत. याशिवाय महायुतीकडून भाजपचे आमदार समाधान आवताडे, तर मनसेकडून दिलीप धोत्रे हे निवडणुकीत नशीब आजमावत आहेत.

मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे पंढरपुरात फोडा फोडीला वेग येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) उमेदवार अनिल सावंत यांच्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांची सभा झाली.

Bhagirath Bhalke- Prashant Paricharak
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिकांच्या भीमा परिवारात फूट; भीमा कारखाना उपाध्यक्षांचा राजू खरेंना पाठिंंबा

त्या सभेत पंढरपुरातील सहा माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. काही नगरसेवक हे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थक आहे, तर काही भगीरथ भालके यांचे समर्थक आहेत, त्यामुळे विधानसभेच्या ऐन धामधुमीत भालके आणि परिचारक यांना धक्का मानला जात आहे.

दरम्यान, पंढरपूरचे माजी नगराध्यक्षांनी भालके गटाला रामराम करत माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटात प्रवेश केला होता. तसेच काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भालके यांच्याऐवजी सावंत यांचे काम करणार असल्याचे जाहीर केले होते, त्यामुळे भालकेंच्या अडचणी वाढल्याची चर्चा आहे.

Bhagirath Bhalke- Prashant Paricharak
Modi Solapur Sabha : सोलापूरसोबतच्या नात्यावर मोदींचे भरसभेत भाष्य; ‘सोलापूरला आलो नाही, तर मी बेचैन होतो...’

माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी त्यांची साथ सोडल्यामुळे त्याचा फटका उमेदवार आमदार समाधान आवताडे यांना बसण्याची शक्यता आहे. हे सर्व माजी नगरसेवक आता अनिल सावंत यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत सावंत यांचा फायदा होतो की नाही, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com