Sanju Parab Shinde Shiv Sena sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shinde Shiv Sena : भाजप सोडून शिंदे शिवसेनेत आलेल्या संजू परब यांच्या हाती सावंतवाडीची धूरा

Sanju Parab Shinde Shiv Sena : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात जोरात सुरू आहे. कोकणात ठाकरे गटाला पूर्ण कमकूवत करण्यासाठी अनेक चेहरे फोडले जात आहेत.

Aslam Shanedivan

Sindhudurg News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन टायगर सध्या राज्यात रोजात सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेसेना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. कोकणात देखील उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात ऑपरेशन टायगर सूसाट सुरू आहे. येथे ठाकरे गटाचे कट्टर नेत्यांसह प्रमुख कार्यकर्ते आपल्या पक्षात घेतले जातायत. आता काहीच दिवसांपूर्वी भाजपमधून आमदान नीलेश राणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तर त्यांच्याबरोबर त्यांचे कट्टर समर्थक देखील शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले होते. आता यातीलच एका समर्थाच्या हाती शिंदे शिनसेनेची जिल्ह्याची धूरा देण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्त पक्ष आमदार दीपक केसरकर यांनी दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असणारे ऑपरेशन टायगरमुळे कोकणासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला आता पुन्हा एकदा खिंडार पडले आहे. उद्धव गटाचे दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेची धूरा शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्यांकडे देण्यात आली आहे. याबाबतचे निुयक्ती पत्र मंगळवारी (ता.18) शिवसेना नेते आमदार दीपक केसरकर, सचिव संजय माशेलकर यांनी परब यांना दिले. परब यांची शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत मुंबई येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता.

संजू परब हे आमदार नीलेश राणे यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्या राजकीय वाटचाल शिवसेनेतून झाली होती. तर ते नीलेश राणे यांच्याबरोबर भाजपमध्ये गेले होते. पण विधानसभेच्या तोंडावर नीलेश राणे यांनी भाजप सोडत शिवसेनेची वाट धरली होती. ते आता शिवसेनेचे आमदार असून यांच्याबरोबरच संजू परब यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता

संजू परब यांनी आपला राजकीय प्रवास शाखाप्रमुख पदापासून केला असून ते सावंतवाडी शहराचे नगराध्यक्षही राहिले आहेत. तसेच त्यांनी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, भाजपचे प्रवक्ते अशी अनेक पदे त्यांनी सांभाळलेली आहेत. त्यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांचा मोठी फळी असून यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना आणखी मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT