Rajan Patil and Pramod Sawant
Rajan Patil and Pramod Sawant  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil : भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांनी स्पष्टच सांगितलं...

विश्वभूषण लिमये

Politics News : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सावंत सकाळीच सोलापुरात दाखल झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर येथील निवासस्थानी भेट दिली.

सावंत यांच्या भेटीमुळे राजन पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. मुख्यमंत्री डॉ.सावंत हे तब्बल एक तास माजी आमदार पाटील यांच्याकडे थांबले. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असेल? याबाबत अनेक तर्कवितर्क उपस्थित करण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवरच राजन पाटील यांनी या भेटीबाबत सांगितले की,''गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे माझ्या कौटुंबिक भेटीसाठी आले होते. आमच्या मुलांची आणि त्यांच्या मित्रांची मैत्री असल्यामुळे ते माझ्या घरी पाहुणचार घेण्यासाठी आले होते'', असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजप प्रवेशावर बोलताना ते म्हणाले, ''राजकारणामध्ये अशा बातम्या येत असतात. निर्णय घेणारा मी कोण आहे. मोहोळ मतदारसंघातील मतदारांनी पन्नास वर्षापासून आमचे नेतृत्व मान्य केले. मतदारसंघातील नागरिकांचा जो निर्णय असेल, तो माझा निर्णय असणार आहे'', असं ते म्हणाले.

''आज गोव्याचे मुख्यमंत्री आले. कांही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांचाही निरोप मी माझ्या मतदारसंघातील नागरिक आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. नागरिक जो निर्णय देतील, तो मला शिरसावंद्य असेल. सत्तेसाठी किंवा इतर कशासाठी दुसरीकडे जाणारा मी माणूस नाही'', असं म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर तुर्तास पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

''पाटील घराण्यावर अनेक संकट आली आहेत. अशा संकटांना आम्ही घाबरत नाहीत. संकटामुळे आम्ही कोणते निर्णय घेणारे माणसं नाहीत. मतदारांना सोडून मी जाऊन काय उपयोग होईल. मतदारसंघाचा निर्णय व्हायला वेळ लागू शकतो. योग्य वेळ आली की निर्णय घेतला जाईल'', असंही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT