Kolhapur News : किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमणा नंतर झालेल्या हिंसाचा बाबत काल इंडिया आघाडीचे नेते खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
या पाहणी नंतर पालकमंत्री गप्प का असा सवाल करणाऱ्या इंडिया आघाडीतील नेत्यांवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या अप्रत्यक्ष आरोप आणि चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
तीन दिवसानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विशाळगड संदर्भात प्रतिक्रिया देताना चौकशी तर सर्वांचीच होणार असा स्पष्ट इशारा दिला आहे. कोल्हापुरातील कागल येथे ते बोलत होते.
अतिरेकी यासिन भटकळ संदर्भात हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केले आहे. यासिन भटकळ कधी, कुणाकडे राहायला होता याची चौकशी करणार आहे. त्यावेळी पोलिसांनी काय केलं याची देखील चौकशी करणार?
कोल्हापुरात वारंवार घडणाऱ्या दंगलीबाबत सर्वांच्याच चौकशीची गरज आहे. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी केलेलं भाष्य महत्त्वाचे मानले जाते.त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या वक्तव्याने सतेज पाटील लवकरच चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
पोलिस याबाबत गाफील राहिले का? याची देखील चौकशी करू. जी माहिती मला जिल्हाधिकारी यांनी दिली ती मी माध्यमांना सांगितली होती.शांतेतेने आंदोलन करण्याचा शब्द दिला होता,असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिस गाफील राहिले आहेत का? नेमके काय झालं याची देखील चौकशी होईल.शाहू महाराजही जाऊन आले त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. अशा घटना घडू नयेत, याची आता खबरदारी घेऊ, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
दरम्यान, विशाळगड वरील झालेल्या हिंसाचाराबाबत कुणाची चूक झाली याचा तपास होईल. वातावरण पूर्वपदावर येईल सलोखा राहील असे प्रयत्न करण्याची गरज आहे. शाहू महाराज यांनीच संभाजीराजांच्या माझ्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. एमआयएमच्या मोर्चाला परवानगी दिली जाऊ नये, याबाबत मी पोलिसांशी बोलेन,असेही मुश्रीफ म्हणाले.
नवाब मलिक यांच्यावर बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) म्हणाले, नवाब मलिक हे अपक्ष निवडणूक लढवणार का? हे मला माहित नाही. आगामी विधानसभेला आता 7 पक्ष रिंगणात असणार,तिकीट मिळत नाही तो इकडून तिकडे उड्या मारणार,असे सांगत विधानसभा निवडणुकीला सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत मुश्रीफ यांनी दिले आहेत.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.