Satej Patil : विशाळगड प्रकरणात सतेज पाटील आक्रमक, थेट 'एसपी'ची बदली करण्याची केली मागणी

Satej Patil on Vishalgad Violence and Encroachment : परिस्थितीची माहिती घेऊन नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. कोल्हापूरचे वातावरण कोणीतरी बिघडवत आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.
Satej patil
Satej patilSarkarnama
Published on
Updated on

Vishalgad Encroachment : विशाळगड येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटने प्रकरणी इंडिया आघाडीची बैठक न्यू राजवाडा येथे पार पडली. खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विशाळगड येथे झालेल्या हिंसाचाराचा निषेध केला.

यावेळी पत्रकारांशी बोलताना झालेल्या हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी करावी तसेच ही घटना टाळण्यात अपयशी ठरलेल्या पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची तत्काळ बदली केली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हते. शिवाय कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात जाती वादाला थारा नाही. यापुढे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत.

आज इंडिया आघाडीचे प्रमुख नेते घटनास्थळी भेट देणार आहेत. परिस्थितीची माहिती घेऊन नुकसानग्रस्तांना राज्य सरकारने भरपाई द्यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. कोल्हापूरचे वातावरण कोणीतरी बिघडवत आहे, असेही सतेज पाटील म्हणाले.

Satej patil
Sambhajiraje Protest : संभाजीराजेंचा लढा यशस्वी! दिवसभरात 50 अतिक्रमणं जमीनदोस्त

दरम्यान आज सकाळी, खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी विशाळगडाकडे (Vishalgad) रवाना झाले.

यावेळी बोलताना शाहू महाराज छत्रपती यांनी किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण हे निपक्ष काढण्यात यावे. शिवाय जे कुटुंब या हिंसाचाराला बळी पडले त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शाहू छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com