shivsena Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Political Crime : मुख्यमंत्र्यांंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अन्‌ युवा सेना जिल्हाप्रमुखांत फ्री स्टाइल हाणामारी

Vijaykumar Dudhale

Solapur News : शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन गटांत सोमवारी (ता. १६ ऑक्टोबर) रात्री साडेअकराच्या सुमारास जोरदार हाणामारी झाली. त्यात तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिंदे गटातील या धुमश्चक्रीमुळे सोलापुरातील सात रस्ता परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Free style clash between two groups in Chief Minister's Shiv Sena)

दरम्यान, शिंदे सेनेच्या दोन गटांतील हाणामारीचे नेमके कारण पुढे आलेले नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीची चर्चा सोलापूर शहरात चांगली रंगली होती. या प्रकरणी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, सिव्हिल पोलिस चौकीत याची नोंद झाली आहे.

शिंदे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुदर्शन बाळासाहेब साठे, प्रियदर्शन बाळासाहेब साठे आणि भगवान प्रकाश कदम यांचा समावेश आहे. या गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या गटाबरोबर भांडण झाले. त्यात साठे आणि कदम जखमी झाली आहेत. त्यांना प्रथम सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार (सिव्हिल हॉस्टिपल) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोलापुरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुदर्शन साठे यांच्याकडे माढा, करमाळा आणि सांगोला असे तीन तालुके आहेत. हे तीनही तालुके लोकसभेसाठी माढा मतदारसंघात येतात. सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीतील नोंदीनुसार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आणि त्यांच्या १० ते १५ सहकाऱ्यांनी सुदर्शन आणि प्रियदर्शन साठे यांना काठी, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात सुदर्शन यांच्या नाका तोंडाला जखम झाली आहे, तर पाठीला मुक्का मार लागला आहे. प्रियदर्शन यांच्या डोक्याला मार लागला आहे, त्यामुळे या दोघा जखमींना त्यांच्या मित्राने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. हाणामारीचे कारण अस्पष्ट असून, मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतच सोलापुरात वाद पेटल्याचे दिसून येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT