Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

BJP Election Strategy : बावनकुळेंनी उघड केली निवडणूक स्ट्रॅटेजी; ‘महायुती उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी भाजपची...’

Thane BJP News : ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कोणामध्ये मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राहुल क्षीरसागर

Thane News : महायुतीत कोणाकडे किती जागा असतील, कोण किती जागा लढवतील, याबाबतचा निर्णय राज्यातील नेते आणि केंद्रीय पार्लमेंट बोर्ड ठरवेल. राज्यातील ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा मानस आहे, त्यामुळे लोकसभेत महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी भाजपची असेल, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ठाण्यात महायुतीच्या निवडणूक स्ट्रॅटेजीबद्दल भाष्य केले. (BJP is responsible for the victory of every candidate of Mahayutti : Chandrashekhar Bawankule)

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे घर चलो अभियान, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी संवाद साधला. राज्यातील प्रत्येक खासदाराने ५१ टक्के मतं घेऊन निवडून यावे, यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

Chandrashekhar Bawankule
Raju Shetti News : बच्चू कडूंनी दिलेला आसूड राजू शेट्टींनी राज्य सरकारवरच ओढला

राज्यात महाविजय-२०२४ ची तयारी सुरू आहे, त्यानुसार राज्यातून ४५ खासदार ५१ टक्के मते घेऊन मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ५१ टक्के मते ही भाजपची असतील, मग महायुतीचा उमेदवार कोणीही असेल त्याला भाजप निवडून आणेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे २२५ आमदार असतील, असा दावाही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल अथवा राज्यातील इतर ठिकाणी कुठेही कोणामध्ये मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीबाबत त्यांना विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ठाण्यात ६०० वॉरियर्स हे साडेतीन लाख घरांपर्यंत जाऊन जनतेला सरकारने केलेल्या कामांची माहिती देतील, तसेच जनतेच्या मनात असलेले गैरसमज ही दूर करतील, असेही त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Sanjay Raut News : 'राहुल नार्वेकरांना चोरांचे सरदार व्हायचे आहे का?'; राऊतांचा रोखठोक सवाल

इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही सर्व पक्षांची इच्छा आहे. यापूर्वीच मराठ्यांना आरक्षण मिळाले असते. मात्र, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुकांमुळे ते आरक्षण मिळू शकलेले नाही. मात्र, आता आमची भावना हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे. परंतु हे आरक्षण देत असताना इतर समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chandrashekhar Bawankule
MLA Rohit Pawar: रोहित पवारांचे पिंपरी-चिंचवडमध्ये 'सोशल इंजिनिअरिंग'; भाजप विरोधी ताकद एकजूट करण्याचा प्रयत्न

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com