New Delhi : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत, समाधानी नाही. अध्यक्षांचे वेळापत्रक आम्हाला मान्य नाही. तुम्ही ३० आक्टोंबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा; अन्यथा आम्ही आमचे वेळापत्रक देऊ, त्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल, अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना आदेश दिला. (Your schedule is invalid; Submit revised schedule by October 30 : Chief Justice's order)
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज (ता. १७ ऑक्टोबर) सुनावणी झाली. त्यात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली. नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेले सुनावणीचे वेळापत्रक अमान्य करून आधीच या प्रकरणाला खूप उशीर झाला आहे, त्यामुळे सुधारित वेळापत्रक ३० ऑक्टोबरपर्यंत सादर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचे वकील महाधिवक्ता ॲड तुषार मेहता यांना दिला.
दसऱ्याच्या सुटीत विधानसभा अध्यक्षांशी बोलून मी वेळापत्रक ठरविण्याचा प्रयत्न करेन, असे तुषार मेहता यांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांचे वेळापत्रक अमान्य असल्याचे सांगितले. विधानसभा अध्यक्षांना ३० ऑक्टोबर ही शेवटची संधी असेल. महाधिवक्ता तुषार मेहता हे अध्यक्षांसोबत बसून सुधारित वेळापत्रक ठरवतील. सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी ३० ऑक्टोंबरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना मुदत असेल, असेही कोर्टाने सुनावले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी वास्तववादी (रियालिस्टिक) वेळापत्रक द्यावं, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देऊन पुढची सुनावणी ता. ३० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सांगितले. अध्यक्षांनी सादर केलेले वेळापत्रक आम्हाला मान्य असेल तर ठीक आहे; अन्यथा आम्ही आमचे वेळापत्रक सादर करू, असेही चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षांचा बचाव करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आम्ही वेळापत्रक सादर केल्याचे सुनावणीत सांगितले. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे काही बरोबर नाही. या प्रकरणाला अगोदरच उशीर झाला आहे. दसऱ्याच्या सुटीत सगळ्यांशी चर्चा करून सुधारित वेळापत्रक बनवावे. तुम्ही दिलं नाही तर आम्ही तुम्हाला वेळापत्रक देईल, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.