Bhagirath Bhalke-Rohit Pawar-Abhijit Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Ncp News : पंढरपुरात राष्ट्रवादीचे भविष्य भगीरथ भालके की अभिजित पाटील? : कळीच्या प्रश्नावर रोहित पवारांचे मौन

रोहित पवारांकडे १७ फेब्रुवारी २०२२ रोजी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : पंढरपूर मतदारसंघाबाबत #AskMeAnything या कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्नाला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उत्तर देणे सोयीस्करपणे टाळले आहे. वास्तविक पंढरपूर मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे असतानाही पक्षीय दृष्टीकोनातून अडचणीचा ठरू पाहणाऱ्या विषयाला रोहित पवारांनी हात घातलेला नाही. (Future of Pandharpur NCP Bhagirath Bhalke or Abhijit Patil? Rohit Pawar's silence on key question)

एका नेटकऱ्याने रोहित पवार यांना ‘पंढरपूर (Pandharpur) मतदारसंघातील NCP पक्षाचे भविष्य काय? भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) की अभिजित पाटील? (Abhijit Patil) ’ असा सवाल केला होता. मात्र, त्यावर पवार यांनी उत्तर दिलेले दिसत नाही. तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने कळीचा आणि नाजूक प्रश्न आहे. कोणा एकाची बाजू घेता येत नसल्यामुळे बहुधा पवारांनी त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला असण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘शंभर प्लस’चा नारा दिला होता. त्यात काही नेत्यांकडे मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात रोहित पवारांकडे १७ फेब्रुवारी २०२२ रोजी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा आणि पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या शंभर प्लस या मोहिमेचे सत्ता गेल्यानंतर काय झाले माहिती नाही. कारण ज्यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली हेाती. त्यांना या मतदारसंघात पक्षवाढीसाठी किती कष्ट घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. नाही म्हटले तरी रोहित पवार अधूनमधून पंढरपूरचा दौरा करत असतात. मागील एका दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील उपस्थित होते. या दोघांनी कारखान्याच्या विश्रामगृहात एकत्र जेवणही घेतले होते.

अभिजित पाटील हे राष्ट्रवादीच्या शीर्ष नेत्यांपासून सर्वांशी संबंध ठेवून आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अभिजित पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार, अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात आहे. मात्र, त्यावर राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आणि अभिजित पाटील दोघेही मौन बाळगून आहेत. त्यामुळे पंढरपूरमधील राष्ट्रवादीचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण होणे सहाजिक आहे.

दुसरीकडे, पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भगीरथ भालके हे काही दिवसांपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून लांब होते. मध्यंतरी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली, एवढंच. त्यांनीही चक्क विरोधकांबरोबर सविचारीच्या नावाखाली हातमिळवणी करत बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी अभिजित पाटील यांना डावलून भगीरथ भालके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकणार का आणि टाकला भालके तो सार्थ ठरविणार का, हा कळीचा मुद्दा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT