Gayatridevi Pantapratinidhi, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav NCP News : औंध सिंचन योजनेसाठी गायत्रीदेवी आक्रमक; अजित पवारांकडून निधी मंजूर करून घेणार

Umesh Bambare-Patil

-निहाल मणेर

Khatav NCP News : राज्यातील महायुती सरकार पाणीप्रश्नावर सकारात्मक आहे. त्‍यामुळे औंधसह परिसरातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेला निधी मंजूर करून घेणार आहे. त्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना या योजनेला निधी मंजूर करण्यासाठी भाग पाडू, असा विश्वास जिल्हा परिषदेच्‍या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी व्यक्त केला.

औंध येथे आयोजित पत्रकारपरिषदेत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी Gayatridevi Pantapratinidhi बोलत होत्या. गायत्रीदेवी म्हणाल्या, औंध परिसरातील जनतेशी माझी कायम बांधिलकी आहे. शेती, पाणीप्रश्न सोडवणे हे माझे कामच आहे. अजित पवार Ajit Pawar यांनी लवादाची आडकाठी असतानाही औंधसह परिसरातील गावांना पाणी द्यायचेच असल्याने सात जानेवारी २०२२ रोजी कण्हेर धरणातून १.२५ टीएमसी पाणी आरक्षित केले आहे.

शासकीय पातळीवर योजनेला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने अजित पवार यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. राज्यातील महायुती सरकार पाणीप्रश्नावर सकारात्मक आहे. त्‍यामुळे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना या योजनेला निधी मंजूर करण्यासाठी भाग पाडू, असे त्यांनी सांगितले.

वीतभर काम अन्‌ गावभर गाजावाजा

पाणीप्रश्नाबाबत वीतभर काम करून हातभार गाजावाजा करायची मला सवय नाही. मी काय करतेय हे मला ओरडून सांगायची आवश्यकता नाही. ही योजना सुरू करण्यासाठी माझे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून उपसा सिंचन योजनेला निधी आणून हा प्रश्न लवकर सोडवण्यात मी निश्चित यशस्वी होईन, असा विश्वासही गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जोपर्यंत योजनेला निधी मिळत नाही, तोपर्यंत शासनदरबारी पाठपुरावा सोडणार नाही, असेदेखील त्यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दीपक नलवडे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, तानाजी इंगळे, गणेश हरिदास, शुभांगी हरिदास उपस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT