गायत्रीदेवींची मुलगी झाली सक्रिय... कामातून स्वतःची ओळख निर्माण करणार

लोकांच्या समस्या People's problems ऐकून घेतल्या जिव्हाळ्याचे प्रश्न intimate questions मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहिन, अशी ग्वाही चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी Charushilaraje Pantapratinidhi दिली.
Charushilaraje Pantapartinidhi
Charushilaraje Pantapartinidhisarkarnama
Published on
Updated on

औंध : औंध संस्थानच्या राणीसाहेब गायत्रीदेवी यांची मुलगी म्हणून नव्हे तर मला कामातून माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. तुमची मुलगी समजून मला समस्या सांगा. सामान्य माणसाच्या अडीअडचणी जाणून घेऊन आईच्या माध्यमातून सोडवण्याचा मी प्रयत्न करीन. तुम्ही मला हाक द्या, मी निश्चित मदतीसाठी उभी राहिन, अशी ग्वाही राजकन्या चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी यांनी दिली.

वडी (ता. खटाव) येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी केल्यानंतर चारूशिलाराजे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे, उपसरपंच वैशाली यादव, सुदर्शन मिठारे, अशोक येवले, अभिजित येवले सचिन थोरात, अब्दुल मुलाणी, बाबालाल मुलाणी, विठ्ठल येवले, शौकत मुलाणी, ज्ञानदेव येवले,अरुण मोहिते, रशिद शेख, फिरोज मुलाणी, अजीज मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चारुशिलाराजे यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच काम दर्जेदार व्हावे याकरिता लक्ष ठेवा, अशी सूचना मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहिन अशी ग्वाही दिली.

Charushilaraje Pantapartinidhi
गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी पुन्हा सक्रिय होणार; या पदांवर संधी  

यावेळी येथील दुर्गादेवीची आरती राजकन्या चारुशिलाराजे यांच्या हस्ते करण्यात आली. दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हणमंतराव शिंदे म्हणाले, वडी गावाने औंधच्या राजघराण्याची नेहमीच पाठराखण केली आहे.विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

Charushilaraje Pantapartinidhi
'राज्याला अजित पवार यांचासारखा मुख्यमंत्री हवा'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com