Shashikant Shinde, Mahesh Shinde
Shashikant Shinde, Mahesh ShindeSarkarnama

Satara Loksabha : कोरेगावात नेत्यांचे बेरजेचे राजकारण; दोन्ही शिंदेंपैकी कोण देणार मताधिक्य ?

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : लोकसभेसाठी मिळणारे मताधिक्य ठरू शकते निर्णायक, महाविकास आघाडीनेही कसली कंबर.
Published on

Satara Loksabha : सातारा लोकसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्येही चांगल्याच जोरबैठका चालू आहेत. महायुतीचा मेळावा येत्या दोन दिवसांत साताऱ्यातील गांधी मैदानावर होणार आहे. त्याबाबत नुकतीच जिल्ह्यातील घटकपक्षांची बैठक झाली. त्यात महायुती जो देईल तो उमेदवार निवडून आणायचा निश्चय यावेळी करण्यात आला.

महाविकास आघाडीतही सातारा लोकसभेसाठी चाचपणी सुरू आहे. दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरू असली तरी अद्याप उमेदवारी निश्चित न झाल्याने सध्या तरी दोन्हीकडील घटकपक्षांची मोट अजूनतरी घट्ट बांधलेली दिसते. यातूनच जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर महायुतीसह महाविकास आघाडीनेही लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
Shivsena News : टोलमाफीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; आनेवाडी टोलनाक्यावर करणार आंदोलन...

त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडी परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळविण्यासाठी दोन्ही आघाड्यांचे नेते प्रयत्नात आहेत. सध्या कोरेगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे महेश शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा पराभव करीत आपली ताकद सिद्ध केली आहे.

त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ असल्यामुळे त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा सपाटा लावला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांचा या मतदारसंघात दबदबा आहे. त्यांनी मागील वेळी झालेली चूक दुरुस्त करून पुन्हा बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची ताकद ही वाढत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गटही येथे कार्यरत आहे. अजित पवार यांनीही युतीच्या वाटणीत सातारा लोकसभा मतदारसंघ मिळावा, म्हणून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याबरोबरच या मतदारसंघात काँग्रेस व उद्धव ठाकरे गट शिवसेनेचीही ताकद असल्याने मतांची विभागणी होत आहे. या ठिकाणी जरी महायुतीचा आमदार सक्रिय असला तरी महाविकास आघाडीतील घटकपक्षांची ताकद मोठी आहे.

ही ताकद येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसणार आहे. सध्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असेल, याचीच चर्चा आहे. सक्षम व दणकेबाज उमेदवार युतीकडून दिला गेल्यास महाविकास आघाडीतील अजित पवार गट कोणाला साथ देणार, यावर येथील मतांची गणिते अवलंबून असतील, तर अजित पवार गटाला साताऱ्याची जागा दिल्यास महायुतीतील घटकपक्ष कशा पद्धतीने काम करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
Uddhav Thackeray News : शिंदेंच्या कार्यकर्त्यांना पळवून लावलं 'त्या' शाखेत उद्धव ठाकरे!

महायुतीकडून कोरेगावमध्ये ताकद लावण्याचा प्रयत्न झाला तरी येथे प्रत्येक नेत्याचे स्वतंत्र गट आहेत. यामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे नितीन पाटील, माजी आमदार डॉ. शालिनीताई पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांत सरळ लढत झाली, तर कोरेगाव मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून होऊ शकतो.

यामध्ये महायुतीची ताकद निश्चित जास्त असेल. लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र राहिले तर महाविकासच्या उमेदवाराचे मताधिक्य वाढू शकते; अन्यथा दोन्ही बाजूचे उमेदवार समसमान मते घेऊ शकतात. महायुतीकडून जितका ताकदीचा उमेदवार दिला जाईल, तेवढ्याच ताकदीने महाविकास आघाडी एकत्र येऊन लढू शकते, त्यासाठी कोरेगाव मतदारसंघातील नेते जिवाचे रान करतील, यात काही शंका नाही.

Shashikant Shinde, Mahesh Shinde
Prithviraj Chavan News : अटल सेतूच्या उद्घाटनावरून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले... ‘अभिनंदन मोदीजी...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com