Satej Patil News : गोकुळ दूध संघावर अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने २९ ऑक्टोबर रोजी होणारी अध्यक्ष निवड सभेला महायुतीचे सर्व संचालक अनुपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अध्यक्ष निवड सभा तहकुब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत समविचारी आघाडीकडे १३ तर महायुतीकडे १२ संचालक आहेत. समविचारी आघाडीकडे बहुमत असले तरी सभेचा कोरम पूर्ण होऊ शकत नाही. त्यांना आणखी एका जागेची गरज आहे. तर महायुतीला दोन जागांची गरज आहे. महायुतीकडून अध्यक्ष करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबईतून जोरदार प्रयत्न सुरु झालेत.
मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे व जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्या पद्धतीने जाता येईल याची माहिती घेतली. शिवाय त्यातील कायदेशीर अडचणी काय? मार्ग कोणता याची माहिती घेतली. शिवाय वकिलांचा सल्ला घेण्याचा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे.
गुरुवारी निवड होत असल्याने बुधवार पर्यंत यासंदर्भात काही निर्णय झालेला नाही. पण बैठकीत शासन नियुक्त चार संचालक वाढवून संचालकांची संख्या २९ करणे, व त्या चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.
दरम्यान गुरुवारी होणाऱ्या सभेला महायुतीचे संचालक गैरहजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात चार शासन नियुक्त संचालक यांना मतदानाच्या अधिकार देऊन वाढवले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी संचालिका शौमिका महाडिक, माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे, अशोकराव फराकटे या चौघाची नियुक्ती शक्य असल्याचे सांगितले जाते.
ही नियुक्ती झाल्यानंतर निर्वाचित २५ संचालक व शासन नियुक्त ४ संचालकांना बैठकीसाठी आमंत्रण दिले जाणार. अशी शक्यता आहे. मात्र या संपूर्ण घटनामुळे गोकुळ दूध संघाची अध्यक्ष निवडणूक न्यायलयीन प्रक्रियेत अडकण्याची चिन्हे आहेत.
कोरम अभावी सभेची अडचण निर्माण झाली आहे. अशावेळी महायुतीकडून सहकार्य अपेक्षित असेल तर सत्तेचा वाटा महत्वाचा आहे. त्यामुळे अडीच वर्ष सत्तेच्या काळात महायुतीला स्थान द्यावे, अशी मागणी ऐनवेळी पूढे येऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.