Gokul chairman: बहुमत असूनही गोकुळच्या अध्यक्षपदाचा पेच कायम; महायुतीच्या नेत्यांना फोन करत सतेज पाटलांकडून जुळवाजुळव सुरू

Gokul election news: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा पेच सोडवण्यासाठी सतेज पाटील यांनी चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ आणि चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले. आबिटकर आणि मंडलिकांनी फोन उचलला नसल्याचा दावाही केला.
Kolhapur politics
Kolhapur politicsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur politics News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत बहुमत समविचारी आघाडीच्या बाजूने असतानाही कोरमअभावी अध्यक्ष निवडीचा पेच कायम आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आमदार सतेज पाटील यांना पुन्हा एकदा राजकीय जुळवाजुळव करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत पाटील यांच्याकडून मोठी तयारी केली जात आहे. अध्यक्ष करण्यासाठी आमदार पाटील यांच्याकडून महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा केली जात आहे.

गोकुळ दूध संघावर बहुमत होऊनही कोरम पूर्ण नसल्याने समविचारी आघाडीचा अध्यक्ष करण्यासाठी सतेज पाटील यांना पुन्हा संघर्ष करावा लागत आहे. पाटील यांनी महायुतीतील नेत्यांशी संपर्क साधत संचालकांना बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. मात्र, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी फोन उचलला नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत बोलताना सतेज पाटील म्हणाले, “मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांतदादा पाटील आणि चंद्रदीप नरके यांच्याशी मी बोललो आहे. आमच्या बाजूने बहुमत आहे. त्यांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे. मात्र, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि संजय मंडलिक यांनी फोन घेतला नाही.” महायुतीच्या संचालकांनी नेत्यांशी बोला असं सांगितलं त्याप्रमाणे सामोपचाराने आपल्या बाजूचे संचालक पाठवून द्यावेत, अशी विनंती केल्याचेही पाटील यांनी सांगितले.

गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांच्या मुलाला अध्यक्ष करण्याची आपली आणि हसन मुश्रीफ यांची इच्छा होती. आता मुश्रीफ यांनी ही इच्छा पूर्ण करावी, असेही पाटील म्हणाले.

Kolhapur politics
Gokul New Chairman : निवडणुकीनंतर गोकुळचे वास्तव, नव्या अध्यक्षाला द्यावे लागणार 'याला' तोंड

विधान परिषदेच्या आज लागणाऱ्या निकाल बोलताना ते म्हणाले, "राज्यातील विधान परिषदेच्या पाच ही जागा निवडून येतील असा विश्वास आहे. यासाठी आम्ही गेले काही दिवस प्रयत्न केले आहेत. आता मतदार राजानं कुणाच्या बाजूने कौल दिला, हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. मात्र माता लक्ष्मीचे दर्शन दुर्दैवानं या निवडणुकीत झालं. आता माता सरस्वतीचा विजय होतो का? ते पाहावं लागेलं".

मुख्यमंत्री गोकुळमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. बहुमत कुणाच्या बाजूला आहे हे मुख्यमंत्र्यांनाही माहीत आहे. हा प्रयत्न कोणाचा आहे, माहित नाही. मात्र तज्ञ संचालक वाढवून तिन्ही पक्षाला एक एक जागा देण्याचा प्रस्ताव असू शकतो. तज्ञ संचालकाला मताचा अधिकार दिल्यावर लोकशाही राहणार नाही. हा नियम कायदाच्या कचाट्यात टिकणार नाही, तज्ञ संचालकांची संख्या वाढून 33 पर्यंत जाऊ शकते, असेही आमदार पाटील म्हणाले.

पुण्यातील मतपेटी सीलवरून बोलताना पाटील म्हणाले, "पुणे पदवीधर मतदारसंघात आठ मतपेट्या सील होत्या हे दुर्दैवी आहे, विभागीय आयुक्तांच्या देखरेखीत निवडणुका होत आहेत. त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे".

आज राज्यामध्ये अल निनोचा प्रभाव आहे. यामुळे देशात आणि राज्यात दुष्काळ पडला आहे. पाऊस काळ कमी होत चालला आहे. ज्या वृक्षांमुळे निसर्गाचा समतोल राहू शकतो ती वृक्ष तोडण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू आहे. पाणी पाऊस नसताना असे प्रकल्प राबवणे कितपत योग्य आहे. असं सांगत आमदार पाटील यांनी भीमाशंकर वृक्षतोडीवरील सरकारला धारेवर धरलं.

Kolhapur politics
Bhimashankar Forest Controversy : महायुतीतच कर्जतच्या वृक्षतोडीवरून मतभेद; सत्ताधाऱ्यांना मुनगंटीवारांनी झापल्यानंतर शिंदेंच्या खासदाराचाही घरचा आहेर

ऑडिओ क्लिपवर म्हणाले, हा भावकीतला वाद

मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित ऑडिओ क्लिपच्या वादावर बोलताना सतेज पाटील यांनी हा भावकीतील वाद असल्याचे म्हटले. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना लक्ष्य करायचे असते, तर ही क्लिप आधीच बाहेर आली असती. आता काढली याचा अर्थ हा दोन पक्षातील वादाचा विषय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com