Gokul Election Latest News : सर्वोच्च न्यायालयाने गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढल्यानंतर आज सहकार विभागाकडून गोकुळ दूध संघाची प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यामुळे खऱ्या अर्थाने आजपासून गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उद्यापासून 21 ऑगस्टपर्यंत यावर हरकती देण्याची सूचना करण्यात आली असून अंतिम यादी चार ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे.
गोकुळ दूध संघाकडून सहकार विभागाकडे 5497 संस्थांची यादी देण्यात आली होती. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून अवसायनातील संस्था आणि मध्यंतरी आदेशातील संस्था पात्र-अपात्र मुद्द्यावरून राजकीय खल निर्माण झाला. यानंतर दूध संघाच्या निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. ज्यानंतर गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसांत घ्या, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या आदेशाची मुदत 4 ऑगस्टला संपली. यानंतर मुदतवाढ देण्याची मागणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
मात्र न्यायालयाने गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया ९० दिवसांत पूर्ण न केल्याबद्दल राज्य सरकारला फटकारत ताशेरे ओढले होते. तसेच ही निवडणूक येत्या ६० दिवसांत पूर्ण करण्याचे सक्त आदेश दिले. तसेच ही मुदतवाढ आणखी सात दिवस वाढवण्यात आली.
निकालाच्या तिसऱ्याच दिवशी सहकार विभागाकडून प्रारूप यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये 4897 दूध संस्थांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. तर 542 संस्था या अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. तर 31 दूध संस्थांनी ठरावच दाखल न केल्याने त्या मतदानास अपात्र आहेत.
दरम्यान, आज कोल्हापूर सर्किट बेंच येथे अवसायनातील 193 दूध संस्थांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाला. या संस्थांना न्यायालयाकडून मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने आज जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव नसले तरी अंतिम यादीत त्यांचा समावेश होणार आहे.
193 दूध संस्थांच्या निकालामुळे उर्वरित दूध संस्थांना देखील त्याचा फायदा होणार असून यामध्ये आणखी काही संस्थांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास संख्या 5200 इतकी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उर्वरित दूध संस्था या लेखापरीक्षण न झाल्याने, निवडणूक न घेतल्याने, दूध संकलन नसल्याने रद्द होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.