

Gokul Election : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून महायुतीच्या नेत्यांमध्येच अंतर्गत रान उठले आहे. अशातच गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 90 दिवसांचा अवधी दिला होता.
ही मुदत 4 ऑगस्टलाच संपल्याने राज्य सरकारने निवडणुकीसाठी पुन्हा 120 दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टाला विनंती केली होती. पण कोर्टाने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी दोन महिन्यांचा अवधी दिला आहे.
हसूर दूध संस्थेचे राहुल सखाराम पाटील यांनी 70 ते 75 दिवसांत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती केली होती. त्याचा विचार करून 60 दिवसांत निवडणूक कार्यक्रम घ्या अशा सूचना दिल्या आहेत.
गोकुळ दूध संघावर प्रशासक मंडळ येऊ नये यासाठी विरोधातील काही माजी संचालकांनी बरेच प्रयत्न केले होते. पण गोकुळमधील अदृश्य शक्तीकडून ही निवडणूक पुढे ढकलण्याची रणनीती आखल्याची चर्चा होती.
यावर राधानगरी तालुक्यातील स्वामी समर्थ दूध संस्थेने 3 महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ घ्यावी अशी मागणी केली होती. संस्थेची मागणी ग्राह्य धरत सुप्रीम कोर्टाकडून गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घ्या अशी सूचना राज्य सरकारला दिली होती.
मात्र वारंवार प्रशासक मंडळाकडून येणारी निवेदन आंदोलन आणि अन्य कारणाने गोकुळ दूध संघातील मतदारांची यादी ठराविक वेळेत झाली नाही. त्यामुळे प्रारूप मतदार यादी देखील अद्याप जाहीर झाली नाही.
दिलेल्या मुदतीत पुन्हा एकदा राधानगरी तालुक्यातील स्वामी समर्थ दूध संस्था ही न्यायालयाचा अवमान म्हणून याचिका दाखल केली होती. शिवाय राज्य सरकारकडून देखील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला आणखी मुदतवाढ मिळावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती.
त्याचवेळी हसूर दूध संस्थनेही 70 ते 75 दिवसांत गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती केली होती. या दोन्ही दूध संस्थांच्या मागणीची दखल घेत कोर्टाने गोकुळमधील अदृश्य शक्तीला दणका देत पुढच्या 60 दिवसांत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.