Kolhapur politics news : कोल्हापुरात अत्यंत चुरशीने सुरू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. तब्बल ५४१८ संस्था सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राजर्षी शाहू समविचारी आघाडी आणि छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या आघाडीच्या माध्यमातून निवडणुक अत्यंत शिगेला पोचली आहे.
जिल्ह्यातील बारा तालुक्यातून होणाऱ्या निवडणुकीत करवीर, राधानगरी, पन्हाळा, आणि कागल हे चार प्रमुख तालुके गोकुळमध्ये विजयाचे टर्निंग पॉईंट ठरणार आहेत. तब्बल 12 ते 13 विद्यमान संचालक महायुतीमध्ये असल्याने महायुतीकडे पारडे झुकले आहे. आजही चौदाशे सभासदांसंदर्भात महायुतीकडून त्यांच्याकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. त्यांची धास्ती आजही महायुतीला आहे.
करवीर मतदारसंघामधून सर्वाधिक 865 संस्था सभासदांची नोंदणी आहे. गेल्या 25 ते 30 वर्षांपासून गोकुळमध्ये कार्यरत असलेले माजी अध्यक्ष विश्वास पाटील याच तालुक्याचे प्रतिनिधी करतात. सध्या पाटील हे शिवसेनेच्या कोट्यातून आहेत. तर महाडिक गटाची ताकद मोठी आहे. तर पाठोपाठ राधानगरी मतदार संघात 699 संस्था सभासद आहेत.हा तालुका माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा गोकुळच्या निवडणुकीत बालेकिल्ला समजला जातो.
यंदा जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील हे महायुतीमध्ये आल्याने राधानगरी तालुक्यातील महायुतीला मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. दरम्यान गेल्या 30 ते 25 वर्षांपासून ज्यांच्याकडे डोंगळे आणि पाटील, त्यांच्याकडेच गोकुळ दूध संघाची सत्ता असे समीकरण बनले आहे. यंदाच्या निवडणुकीत देखील तीच परिस्थिती असल्याने अनेक मातब्बर नेत्यांची फौज गोकुळच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
पन्हाळा तालुक्यात देखील तब्बल 513 संस्था सभासदांची नोंदणी आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. 25 वर्षाच्या राजकारणात दूध उत्पादकांचा विश्वास संचालक नरके यांच्यावर असल्याने जिल्ह्यात संस्था पातळीवर नरके यांच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो. शिवाय अनेकदा गोकुळ संघावर तज्ञ संचालक म्हणून देखील काम केले आहे. इंडियन डेअरीचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत.
मागील निवडणुकीपासून त्यांचे चिरंजीव चेतन नरके रिंगणात आहेत. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाडिक गटाच्या पॅनेलमधून जे तीन उमेदवार निवडून आले त्यामध्ये डॉ. चेतन नरके यांचा देखील समावेश होता. पाठोपाठ कागल मध्ये देखील 619 सभासदांची नोंद आहे. मात्र या संस्था सभासदांची नोंद मंडलिक,मुश्रीफ आणि घाटगे गटात विभागली आहे. तिघेही महायुतीमध्ये एकत्र असले तरी मागील निवडणुकीत मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला होता.
गेल्या सहा महिन्यापासून संस्था अपात्र आणि पात्रतेवरून सुरु असलेल्या प्रकाराचा अनेकांना त्रास सहन करावा लागला आहे. अशातच सर्व एकत्र आल्याने 1400 संस्था आपल्याच पारड्यात मत टाकतील याची शाश्वती नाही. त्यामुळे शपथा सुरु असल्याने पुन्हा एकदा महायुतीमध्ये धुसफूस सुरु आहे.
असे आहेत तालुकानिहाय मतदार
आजरा - 305
करवीर - 865
कागल - 619
गगनबावडा - 131
गडहिंग्लज - 399
चंदगड - 423
पन्हाळा - 513
भुदरगड - 593
राधानगरी - 699
शाहूवाडी - 440
शिरोळ - 270
हातकणंगले - 161
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.