Gokul Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif Vs BJP : भाजपच्या खेळीनंतर नवा ट्विस्ट: मुश्रीफांना बाजूला करण्याच्या मागणीनं गोकुळमध्ये तणाव?, राष्ट्रवादीही मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Gokul Election politics Row : ‘गोकुळ’च्या निवडणुकीवरून महायुतीत कमालीचा वाद होताना दिसत असून आता मंत्री मुश्रीफ यांनाच बाजूला ठेवण्याची रणनीती काही भाजपचे नेते आखत आहेत.

Rahul Gadkar

  1. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये तणाव वाढला आहे.

  2. काही भाजप नेत्यांकडून मंत्री हसन मुश्रीफ यांना बाजूला करण्याची मागणी होत आहे.

  3. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Kolhapur Politics News : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुणे दौऱ्यावरून येताना रेल्वेतूनच गोकुळ संदर्भात चर्चा केल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात गोकुळ संदर्भात काय भूमिका आहे? याचे पडसाद आता पत्रकाद्वारे उमटत आहेत.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या पदाधिकारी आणि आमदाराने केलेल्या चर्चेनंतर मंत्री मुश्रीफांच्या शिलेदारांना वेगळाच संशय आला आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढत असताना मंत्री मुश्रीफ यांना बाजूला ठेवण्याची मागणी काही भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. त्यावर गोकुळचे आणि जिल्हा बँकेचे संचालक युवराज पाटील आणि भैय्या माने यांनी पत्रकार परिषद घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

‘गोकुळ’च्या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून पॅनेल करावे, अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मांडल्याचे समजते. मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षांचे संयुक्त पॅनेल बनवावे’, अशी मागणी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील महायुतीतील नेत्यांच्या समझोत्यासंदर्भात बैठका घेऊन काही नेत्यांशी चर्चा केल्याचे वृत्तपत्रांमधून वाचले. मंत्री पाटील यांनी भारतीय जनता पक्षासह मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे यांच्याबरोबर चर्चा केलेल्या वृत्ताची माहिती आम्हाला मिळाली. तसेच काही नेत्यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि विशेषतः मंत्री मुश्रीफ यांना वगळून पॅनेल तयार करा, अशी भूमिका मांडल्याचेही समजते.

या पार्श्वभूमीवर तमाम दूध उत्पादकांच्यावतीने मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यामध्ये सोबत येणाऱ्या मित्रपक्षांना घेऊन गोकुळ दूध संघाची ही निवडणूक लढवावी. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने हे पॅनेल झाले, तर ‘गोकुळ’मध्ये महायुतीचीच सत्ता येईल आणि त्या निकालाच्या रूपाने मुख्यमंत्र्यांना एक चांगली भेट देऊ. या संदर्भात यापुढे मुख्यमंत्र्यांशी कधी चर्चा होईल, त्यावेळी हा मुद्दा मंत्री मुश्रीफ यांनी जरूर मांडावा. मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन या निवडणुकीत एकदाचा सोक्षमोक्ष लावावा आणि ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ करून दाखवावे.

FAQs :

1. गोकुळ प्रकरणात वाद का निर्माण झाला आहे?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व आणि भूमिकेवरून मतभेद झाले आहेत.

2. कोणाला बाजूला करण्याची मागणी होत आहे?
मंत्री हसन मुश्रीफ यांना बाजूला करण्याची मागणी काही भाजप नेत्यांकडून होत आहे.

3. या प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप मागितला आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्तक्षेप मागितला आहे.

4. हा वाद कोणत्या भागात सुरू आहे?
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या राजकारणात हा वाद सुरू आहे.

5. पुढे काय होऊ शकते?
राजकीय तोडगा किंवा उच्चस्तरीय हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT