Hasan Mushrif News: चाकणकरांनतर महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोण? राष्ट्रवादीचा दावा कायम; मुश्रीफ म्हणाले....

Who Will Be Maharashtra Women Commission Chairperson: रुपाली चाकणकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य महिला आयोगावर राष्ट्रवादीचा दावा कायम ठेवला आहे.
Hasan Mushrif
Hasan Mushrif Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: भोंदू अशोक खरातच्या प्रकरणात नाव गोवल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य महिला आयोगावर राष्ट्रवादीचा दावा कायम ठेवला आहे.

राज्य महिला आयोग अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख कार्यकर्ते नेते मंडळींचा विचार करतील. राष्ट्रवादी काँग्रेसची कर्तबगार महिलाच महिला आयोगाची अध्यक्ष होईल कारण ही जागा राष्ट्रवादीचीच आहे, असे ठामपणे सांगितले आहे.

प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ आहे. सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष चांगली प्रगती करेल. आमच्यात काही छोटे मोठे मतभेद असतील तर ते आमच्यात बसून आम्ही सोडवू. सुनेत्रा पवार या योग्य पद्धतीने या संदर्भातलं आपलं मत मांडतील. आमचा पक्ष एकसंघ आहे.

Hasan Mushrif
Gokul Milk Election: गोकुळ दूध संघाच्या राजकारणाला पुन्हा 'उकळी' फुटली! एका रात्रीत अधिकाऱ्याची उचलबांगडी

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करू, असे स्पष्ट केले. खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, राष्ट्रवादी अजित दादा पवार यांचा पक्ष सोडून एकही आमदार बाहेर जाणार नाही. आता वास्तविक संजय राऊत यांनी आपले खासदार सांभाळावे तेच बरेच हे चाललेले आहेत. अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत.

सर्व संचालक सर्व नेत्यांना भेटत आहेत ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची भावना आहे. योग्य वेळी या संदर्भात आपण बोलूयात. अशा संस्थांच्या चौकशी होणं चौकशी समिती नेमणं हा एक नियमित भाग आहे.

नवीन संस्था आणि संदर्भात उच्च न्यायालयात देखील केस आहे. उच्च न्यायालय देखील या संदर्भात योग्य निर्णय देतील. नियमबाह्य संस्था असतील तर त्या मतदानापासून बाहेर जातील, पात्र असतील ते मतदान करतील, असे स्पष्टीकरण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ संघाच्या बाराशे सभासदांबाबत देत एका रात्रीत अधिकारी बदलला यावर बोलताना, गोकुळ वर सत्ता युतीची आहे. चेअरमन युतीचे आहेत. त्यामुळेमुख्यमंत्री यामध्ये काहीही करणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे.

Hasan Mushrif
Pune Congress News: काँग्रेस राबवणार शिवसेना, राष्ट्रवादीचा फार्म्युला! पुण्याला मिळणार नवा कारभारी

शक्तिपीठ महामार्ग हा माझ्या विधानसभा मतदारसंघातून जाणार होता. त्यावेळी निवडणुका लागल्या होत्या त्यामुळे तो आदेश मी रद्द करण्याचा प्रयत्न केला होता.आज त्या रस्त्याची अलाइनमेंट बदलल्याच मी वाचलं पण ते फायनल आहे. की नाही मला माहिती नाही. पण हा मार्ग माझ्या मतदारसंघातून जाणार नाही. ज्या भागातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. त्या भागातील नेते आणि शेतकऱ्यांची काय भूमिका आहे हे पाहणे गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासंदर्भात मी रद्द करण्याचा प्रयत्न केला. आता जिल्ह्यातील इतर मतदारसंघातील शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्यांनी मला भेटावा. शक्तिपीठ महामार्गाला इतर मतदारसंघातून विरोध झाला तर जिल्ह्याचा नेता म्हणून आम्ही सर्व मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भात विचार करू. चंदगडच्या आमदारांची शक्तीपीठ संदर्भात मागणी होती. त्यांनी त्या संदर्भात तो रस्ता चंदगड मधून नेलेला आहे, असे मुश्रीफ म्हणाले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com