Gokul Election News: कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवार जाहीर करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी छत्रपती शाहू विकास आघाडी या पॅनेलची यादी समाज माध्यमातून जाहीर केली. यात गोकुळमधील प्रस्थापितांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे, तर चार संचालकांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामध्ये बाळासाहेब खाडे, प्रा. किसन चौगुले, बाळासाहेब खाडे, नंदकुमार ढेंगे यांचा समावेश आहे.
दरम्यान उमेदवारीच्या घोषणांमुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकले आहे. अनेकांनी आपल्या उमेदवारीची खात्री होताच सुटकेचा निश्वास सोडला. मात्र ज्यांना डावलले जात आहे असा अंदाज येताच बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाराज उमेदवार प्रा. किसन चौगुले यांनी आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीत प्रवेश केला आहे. समविचारी आघाडीतून प्रा. चौगले यांची उमेदवारी जाहीरही झाली आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांनी महायुतीत प्रवेश केला. त्यांच्या महायुतीमधील प्रवेशावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस होती. महायुतीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे चौगले यांनी काँग्रेसची वाट धरली. मात्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी चौगुले यांना स्वीकृत संचालक म्हणून अडीच वर्ष संधी देण्याचे परिपत्रक जारी केले आहे.
शिवसेनेमध्ये देखील जागा वाटपावरून बरीच खलबते झाली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्यामध्ये बराच खल झाला. यापूर्वी नरके गटाला ३ जागा तर आबिटकर गटाला २ जागा देण्यात आल्या होत्या. माजी संचालक एस. आर. पाटील यांना डावलण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर होता. अखेर पालकमंत्री आबिटकर आणि आमदार नरके यांच्यात झालेल्या चर्चेनुसार नरके गटाला ४ जागा देण्यात आल्या.
•भाजप
डॉ. चेतन नरके ( माजी संचालक)शौमिका महाडिक (माजी संचालिका)
अंबरीश घाटगे (माजी संचालक)
विश्वास जाधव ( माजी संचालक)
अशोक चराटी
दीपक पाटील
प्रताप पाटील- कावणेकर
•जनसुराज्य शक्ती
अमरसिंह पाटील ( माजी संचालक)
करणसिंह गायकवाड( माजी संचालक)
•राष्ट्रवादी काँग्रेस (मंत्री मुश्रीफ)
नविद मुश्रीफ ( माजी अध्यक्ष संचालक)
अर्चना ए. पाटील
रणजितसिंह पाटील ( माजी संचालक)
युवराज पाटील (माजी संचालक)
अरुण डोंगळे ( माजी अध्यक्ष संचालक)
राजेश पाटील (माजी आमदार)
राहुल पाटील (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष)
सतीश पाटील (माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष)
•राजर्षी शाहू आघाडी (राजेंद्र पाटील यड्रावकर गट)
रणजितसिंह दिलीपराव माने-पाटील
•शिवसेना
अजित नरके ( माजी संचालक)
विश्वास पाटील ( माजी अध्यक्ष संचालक)
अजित पाटील-परितेकर
वीरेंद्र मंडलिक (मंडलिक गट)
माजी आमदार सुजित मिणचेकर ( माजी संचालक)
मदन देसाई
संभाजी पाटील (माजी संचालक)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.