Gokul News: गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचा सस्पेन्स आता संपला आहे. अर्ज माघारीचा गुरुवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार याचा सस्पेन्स राहिला आहे. महायुतीमधून उमेदवारी कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
तत्पूर्वी, 'सरकारनामा'कडे गोकुळच्या संभाव्य उमेदवारांची यादी प्राप्त झाली आहे. महायुतीकडून यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी जवळपास संभाव्य उमेदवारांची ही यादी निश्चित समजली जाते. दरम्यान, उद्या महायुतीकडून या उमेदवारांची घोषणा शक्य आहे.
महायुतीमधून उमेदवारी देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि आमदार राजेंद्र यड्रावकर गटाने गोकुळमधील ठरावांची ताकद किती आहे, यावर उमेदवारी देण्याचा निर्णय प्राथमिक क्षणी दिसत आहे. यामध्ये महायुतीकडून गोकुळ दूध संघातील तीन माजी अध्यक्षांना संधी तर माजी आमदारांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.
शिवाय माजी अध्यक्षांच्या घरात देखील उमेदवारी जाण्याची शक्यता आहे. यामध्ये अरुण डोंगळे, विश्वास पाटील, नविद मुश्रीफ,माजी आमदार राजेश पाटील यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. शिवाय माजी अध्यक्ष असलेल्या शिरोळ मधील माने पाटील गटात उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
•भाजप
शौमिका महाडिक
अंबरीश घाटगे
विश्वास जाधव
धैर्यशील देसाई
चेतन नरके
दीपक पाटील
प्रताप पाटील
•जनसुराज्य शक्ती
अमरसिंह पाटील
करणसिंह गायकवाड
•राष्ट्रवादी काँग्रेस (मंत्री मुश्रीफ)
नविद मुश्रीफ
ए वाय पाटील
रणजितसिंह पाटील
बाळासाहेब खाडे
अरुण डोंगळे
राजेश पाटील (माजी आमदार)
तेजस्विनी पाटील
सतीश पाटील
•राजर्षी शाहू आघाडी (राजेंद्र पाटील यड्राव्हकर गट)
रणजितसिंह दिलीपराव माने-पाटील किंवा रेखादेवी माने- पाटील
शिवसेना
अजित नरके
विश्वास पाटील
संभाजी पाटील किंवा अजित पाटील (परितेकर)
वीरेंद्र मंडलिक (मंडलिक गट)
माजी आमदार सुजित मिणचेकर
मदन देसाई
अशोक फराकटे किंवा नंदकुमार ढेंगे(ढेंगे यांचा विचार होऊ शकतो)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.