कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठराव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज गोकुळमधील आपली ताकद दाखवून शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेसचे ठराव दाखल करणार आहेत. मात्र ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला आहे.
त्याच ठिकाणी प्रवेशद्वारावर काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांनी बॅनरबाजी करत मंत्री हसन मुश्रीफ यांना डिवचले आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकत्र असल्याने गोकुळ दूध संघाची निवडणूक एकसंघ लढली.
मात्र सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे महायुती म्हणून तर त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील हे राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे यंदाची गोकुळ दूध संघाची निवडणूक ही एकमेकांच्या विरोधात लढणार आहेत.
आज राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील ठराव धारकांना कोल्हापुरातील महासैनिक दरबार येथे एकत्र केले आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील अनेक ठराव धारकांनी उपस्थिती लावली आहे. मात्र काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महासैनिक दरबारच्या प्रवेशद्वारावरच यांनी बॅनरबाजी केली आहे. मागील पाच वर्षात म्हशीच्या दुधाला 14 आणि गाईच्या दुधाला दहा रुपये दरवाढ दिली असल्याचं या फलकावर ठळकपणे उल्लेख केला आहे. सतेज पाटील यांनी लावलेल्या या फलकामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
एकीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय मैत्री सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सतेज पाटील यांनी मेळाव्या ठिकाणी केलेली बॅनरबाजी मंत्री मुश्रीफ गटाला डिवचणारी आहे. आगामी गोकुळच्या राजकारणात त्याचे नेमके पडसाद काय होणार हे देखील पहावे लागणार आहे.
सतेज पाटलांची शहरभर बॅनरबाजी
ठराव दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी शहरभर बॅनरबाजी केली आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी या मथळ्याखाली गेल्या पाच वर्षातील लेखाजोखा या फलकाच्या माध्यमातून मांडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.