Farmer Crop Loan Relief : 56 लाख शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा; 'या' तारखेपूर्वी खात्यावर पडणार 'कर्जमाफीचा' मेसेज

56 lakh farmers crop loan relief announcement: महाराष्ट्रातील 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. कर्जमाफी योजनेबाबत दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची घोषणा केली असून पात्र शेतकऱ्यांना लवकरच खात्यावर कर्जमाफीचा मेसेज मिळणार आहे.
Dattatray bharane
Dattatray bharaneSarkarnama
Published on
Updated on

Dattatray Bharane farmer loan relief news: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचे टेन्शन आता कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर लककरच कर्जमाफीसंदर्भातील मेसेज पाठवण्याची तसारी सुरु आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शेतकरी कर्जमाफी योजना अंतिम टप्प्यात असून 30 जूनपूर्वी लाभार्थ्यांना दिलासा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2019 मध्ये काही कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही नव्या प्रक्रियेत विचार केला जाणार आहे. त्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Dattatray bharane
Bank Jobs 2026 : 12 वी पास आहात? मग पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भरतीबाबत शासनाचा मोठा निर्णय जारी!

राज्य सरकारच्या नव्या कर्जमाफी योजनेअंतर्गत सुमारे 56.24 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्यासाठी 36,585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याआधी 2009, 2017 आणि 2019 या कालावधीतही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला होता. आता नव्या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांना मोबाईलवर संदेश पाठवून प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. ही प्रक्रिया जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही कर्जमाफीचा मुद्दा गाजला. विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यानंतर सरकारकडून कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com