Gokul Milk President Election 2025 sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Milk Sangh: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोणाच्या मर्जीतला? नव्या चेहऱ्याला संधी....

Gokul Milk President Election 2025:सत्ताधारी मधील मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाठबळ असले तरी गोकुळ मधील विरोधकांची सत्ता राज्यात असल्याने गोकुळ मधील सत्ताधारी नेत्यांना देखील काही अडचणी येत आहेत.

Rahul Gadkar

kolhapur Gokul Milk News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या कार्यकाळाची मुदत संपत आहे. त्यानंतर पुढील अध्यक्ष कोण याबाबाबत कोणीच काही बोलत नाही. एकीकडे महायुती मधील भाजप नेत्यांनी गोकुळ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यासोबत सूत जुळवले आहे.

गुढीपाडव्यानंतर अध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. गोकुळमध्ये अध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक आहेत. पण तत्पूर्वी झालेल्या बैठकीत गोकुळ अध्यक्षांबाबत चर्चा झाली नाही. आत्ताच हे वावटळ उठलं, तर संचालकांची नाराजी कोण घेणार? त्याची भीती वरिष्ठ नेत्यांना आहे.

नूतन अध्यक्ष कोण होणार याबाबत सध्या शांतता आहे. मात्र, ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे सांगण्यात येते. उघडपणे सध्या कोण उत्सुक आहे, याचे नाव अद्याप जाहीर नाही. अध्यक्ष डोंगळे हे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जवळचे आहेत. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांचेही ते विश्‍वासू आहेत.

भविष्यात गोकुळची घोडदौड कायम ठेवण्यासाठी नेत्यांकडून डोंगळे यांना पुन्हा पुढे संधी दिली जाऊ शकते. मे नंतर होणाऱ्या अध्यक्षांच्या कालावधीत पुढील पंचवार्षिक निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या काळात नेत्यांच्या विश्‍वासातील अध्यक्ष असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे डोंगळेंची जागा दुसरा कोण घेऊ शकतो, असे नाव अद्याप तरी पुढे आलेले नाही. मात्र, नव्या चेहऱ्यालाही संधी मिळू शकते. त्यामुळे सध्या तरी वादळापूर्वीची शांतता आहे.

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर गोकुळ मधील चित्रदेखील बदलले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जिल्ह्यात एक ही जागा न मिळाल्याने मर्जीतल्या संचालकांची थोडीफार तोंडी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची देखील भूमिका सध्यातरी वेट अँड वॉच ची आहे.

सत्ताधारी मधील मंत्री हसन मुश्रीफ यांचे पाठबळ असले तरी गोकुळ मधील विरोधकांची सत्ता राज्यात असल्याने गोकुळ मधील सत्ताधारी नेत्यांना देखील काही अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या गोकुळ मधील पंचवार्षिक निवडणुकीला मंत्री मुश्रीफ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या मर्जीतीलच तिसरा अध्यक्ष असावा, जेणेकरून पुढील निवडणुकीत त्याचा फायदा होईल. त्यामुळे असा चेहरा म्हणून पुन्हा डोंगळे यांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. शिवाय माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या नावाला काही संचालकांचा विरोध होऊ शकतो. त्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यातील भाजपचे नेते देखील काही संचालकावर डोळा ठेवून आहेत. या अध्यक्षपदावरून डावलेल्या नाराजांना भाजप आपल्या बाजूने घेऊ शकते. याची भीती देखील गोकुळ मधील सत्याधाऱ्यांना आहे. त्यामुळे अध्यक्षपदावरून सध्या तरी वादळापूर्वीची शांतता आहे. गुढीपाडव्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT