Nashik Kumbh Mela 2027: भाजपचे 'संकटमोचक' नाशिकच्या 'आखाड्यात'! कुंभात पहिलं शाहीस्नान कोण करणार?

Girish Mahajan ON Nashik kumbh mela controversy: कुंभमेळ्याला नाशिकचे नाव देऊ देणार नाही, अशी भूमिका रवींद्र पुरी महाराजांनी घेतली आहे. नामकरणाचा वाद मिटवण्यासाठी रवींद्र पुरी महाराज त्र्यंबेश्वरच्या दौऱ्यावर आहेत.
 Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Kumbh Mela News : आगामी वर्षात म्हणजे 2027 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आखाड्याच्या तयारी सुरु आहे, पण कुंभमेळ्याच्या नामकरणावरुन वाद निर्माण झाल्याने कुंभमेळ्याच्या आधीच साधुंसंतांमध्ये 'आखाडा' रंगला आहे. यात भाजपचे 'संकटमोचक' मंत्री गिरीश महाजन यावर काय तोडगा काढतात, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

नाशिकच्या कुंभात पहिलं शाहीस्नान कोण करणार यावरुनही वाद निर्माण झाला आहे. या परिस्थितीत गिरीश महाजन यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी यांची भेट घेतली. त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. आखाडा परिषदेचे महामंत्री हरीगिरी महाराज देखील या बैठकीला उपस्थित होते.त्र्यंबकेश्वरमधील विकास कामांच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. त्र्यंबकेश्वरच्या पंच दशनाम जुना आखाडामध्ये ही बैठक झाली.

 Nashik Kumbh Mela 2027
Santosh Deshmukh case: संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाईंड सुदर्शन घुले की वाल्मिक कराड? ही पळवाट ...

कुंभमेळ्याला नाशिकचे नाव देऊ देणार नाही, अशी भूमिका रवींद्र पुरी महाराजांनी घेतली आहे. नामकरणाचा वाद मिटवण्यासाठी रवींद्र पुरी महाराज त्र्यंबेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. पेशव्यांच्या काळात त्र्यंबकेश्वरला शैव तर नाशिकच्या रामकुंडात वैष्णव शाही स्नान करतात असा निवाडा झाला होता. पण प्रयागराजला राष्ट्रीय आखाडा बरखास्त झाल्यानं शाहीस्नान कोण करणार याचा निर्णय झाला नसल्याचा दावा महंतांनी केलाय. गिरीश महाजन या वादावर काय तोडगा काढतात, हे लवकरच समजेल.

 Nashik Kumbh Mela 2027
Maharashtra Assembly: अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर समित्यांच्या प्रमुखांची नावे जाहीर; रांजळे, राणा यांच्यावर महत्वाची जबाबदारी

साधुसंतामध्ये काय आहे वाद जाणून घेऊया

  • त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा असं म्हणायचं की नाशिक-त्र्यंबकेश्वर म्हणायचं यावरुनही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये जुंपलीय.

  • कुंभमेळ्याला नाशिकचे नाव देण्यास रवींद्र रपुरी महाराजांचाही विरोध आहे.

  • महंत सुधीरदास पुजारी आणि अनिकेत शास्त्री देशपांडे हे साधू महंत नसल्याचा आरोप महंत शंकरानंद सरस्वतींनी केलाय.

  • नामकरणासह शाहीस्नानावरून देखील वाद सुरू असल्याचं दिसत आहे.

  • शाहीस्नानाचा अधिकार कुणाचा यावरुनही महंतांमध्ये तीव्र मतभेद आहेत.

  • कुंभात पहिलं शाहीस्नान कोण करणार यावरुन वाद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com