Gokul Politics; Devendra Fadnavis, Eknath Shinde and hasan mushrif  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Politics : अखेर 'गोकुळ'वर प्रशासक! CM फडणवीसांनी 5 जणांच्या टीमवर सोपवला कारभार : मुश्रीफ अन् संचालक मंडळाला धक्का

Devendra Fadnavis Decision Over Gokul Politics : कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर प्रशासक नको म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या संचालक मंडळाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार धक्का देत प्रशासक नियुक्ती केली आहे.

Rahul Gadkar

  • गोकुळ दूध संघावर 5 सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली.

  • संचालक मंडळ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकाला विरोध केला होता.

  • मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयामुळे गोकुळच्या राजकारणात नवा टप्पा.

kolhapur news : गेल्या अनेक दिवसांपासून गोकुळ दूध संघाचे राजकारण उफाळून आले आहे. दूध संघावर प्रशासक नको अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत संचालक मंडळाने घेतली होती. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर प्रशासक नको म्हणून देव पाण्यात घालून बसलेल्या संचालक मंडळाला अखेर मुख्यमंत्र्यांनी चांगलाच धक्का दिला आहे.

फडणवीस यांनी, गोकुळ दूध संघाच्या प्रशासक पदाचा कारभार एका अधिकाऱ्यावर न सोपवता या प्रशासक मंडळावर तब्बल पाच जणांची नियुक्ती केली आहे. या संदर्भाचे अध्यादेश आज विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी दिले. तर प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक यांची नियुक्ती केली आहे.

गोकुळच्या या प्रशासक मंडळावर सातारा जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संजयकुमार सुद्रिक हे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष, कोल्हापूर चंदगडमधील सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, पुणे येथील सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे, लेखापरीक्षक सागर बलकवडे व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे कक्ष प्रमुख चंद्रकांत परुळेकर यांचे या प्रशासक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान गोकुळ दूध संघावर प्रशासक नको या मागणीसाठी आज काही संचालकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचे समजते. मात्र तत्पूर्वीच या संदर्भातील आदेश गोकुळ प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. आज संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने उद्यापासून गोकुळ दूध संघावर प्रशासक राज सुरू होणार आहे.

गेल्या पाच वर्षात गोकुळ दूध संघावर लेखापरीक्षण, विविध योजनेतील अपहार, भ्रष्टाचार, निवडणुकीसाठी सभासद वाढवलेल्या बोगस दूध संस्था असे आरोप होत आलेले आहेत. त्या संदर्भात अनेक तक्रारी गोकुळकडे प्राप्त झाल्या आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कोणतीच कारवाई न झाल्याने तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती.

30 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्किट बेंच ने जोपर्यंत तेराशे आठ संस्थांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक नाही असा निकाल दिल्यानंतर गोकुळ दूध संघावर प्रशासक येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर आज त्या संदर्भातील आदेश प्राप्त झाले.

FAQs :

1. गोकुळ दूध संघावर काय निर्णय घेण्यात आला
5 सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली

2. या निर्णयाला विरोध कोणी केला होता
संचालक मंडळ आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता

3. प्रशासक मंडळाचा प्रमुख कोण आहे
संजयकुमार सुद्रिक यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे

4. हा निर्णय कोणी घेतला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला

5. या निर्णयाचा परिणाम काय होईल
गोकुळच्या प्रशासनात मोठे बदल आणि निवडणूक प्रक्रियेत विलंब होऊ शकतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT