Tukaram Mundhe : 'तुकाराम मुंडे' गोकुळचे प्रशासक? शिवाजी पाटलांनी संकेत देत मुश्रीफांना दिले झटके, 'आबाजीच मुख्य बाबाजी...'

shivaji patil vs hasan mushrif : गोकुळच्या राजकारणावरून सध्या आरोप प्रत्यारोपांचा खेळ पाहायला मिळत आहे. तर आता अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी ईडी चौकशी लावावी अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे म्हटले आहे.
Tukaram Mundhe
Tukaram Mundhesarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. गोकुळ दूध संघाच्या राजकारणावरून शिवाजीराव पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात वाद तीव्र झाला

  2. पाटील यांनी डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यावर ED चौकशीची मागणी केली

  3. गोकुळवर तुकाराम मुंडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली

kolhapur gokul politics : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात सुरू असलेल्या गोकुळच्या राजकारणावरून आरोप प्रत्यारोपाचा खेळ आज ही रंगला. शिवाय गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यावर ईडी चौकशी लावावी अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर आबाजी हेच गोकुळमधील मुख्य बाबाजी आहेत. शिवाय मुश्रीफ यांनी माझा जो काय पूर्व इतिहास बाहेर काढायचा तो काढू देत. माझी सर्वोत्तोपरी तयारी आहे. मी जनतेच्या पैशावर डल्ला मारत नसल्याचा टोला आमदार शिवाजीराव पाटील यांनी मुश्रीफांना लगावला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

सतेज पाटील व हसन मुश्रीफ यांची गोकुळमध्ये पाहिली टर्म आहे. आबाजी आणि डोंगळे हे पंचवीस वर्षांपासून सत्तेत आहेत. डोंगळेची दुबईमध्ये मोठी गुंतवणूक आहे. आबाजी हे गोकुळमधील मुख्य बाबाजी आहेत. माझी प्रामाणिक इच्छा आहे की यांची चौकशी झाली पाहिजे.

यामुळे गोकुळवर प्रशासक म्हणून तुकाराम मुंडे यांच्या नियुक्तीची मागणी करणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी करणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. तर डोंगळे व विश्वास पाटील यांच्या बाबतची चौकशीचे पत्र देखील मुख्यमंत्र्यांकडे देणार असल्याचे सांगितले आहे.

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe News : तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचे थेट मंत्रालयात पडसाद; पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्याला दणका

प्रशासक आणल्यानंतर गोकुळमध्ये नेते किती मलई खातात हे लक्षात येईल. राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्यातीलच संचालक अधिक आहेत. दुर्गम तालुक्यातील सर्वसामान्य घरातील संचालक यांना नकोत का? असा सवाल करत मुश्रीफ यांची ताकद आहे. त्यामुळे ते बोलत असतील, पण माझी ताकद ही प्रामाणिकपणा आहे. कोणाच्या पाठीशी राहायचं याचा निर्णय ठरावधारक चौकशी नंतरच घेतील, असा टोला आमदार पाटील यांनी लगावला.

मुश्रीफ साहेबांनी माझा पूर्वा इतिहास काढावा मी त्याची वाट पाहत आहे. माझी तयारी आहे, बुधवारी माझ्या बाबत मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार करणार आहे. मी कोणाला फसवलेलं नाही, जनतेचा गल्ला लुटलेला नाही, प्रामाणिक आहे. जे आहे ते मुश्रीफ साहेबांनी बाहेर काढावं, इतकी ताकदीचे आहेत तर सत्य सोडून का बोलतात? असा सवाल आमदार पाटील यांनी मुश्रीफ यांना केला.

हसन मुश्रीफ हे मोठ्या ताकतीचे नेते आहेत. ते 40 वर्षापासून राजकारणात आहेत राष्ट्रवादीचे ते दिग्गज नेते आहेत. त्यांनी त्यांची ताकद ही चंदगडमध्ये देखील दाखवलेली आहे. पण मंत्री मुश्रीफ साहेब यांच्या बद्दल माझं व्यक्तिगत वैर नाही. मला गोकुळ दूध संघाच्या भ्रष्ट कारभाराबाबत बोलायचं आहे.

प्रशासक लावून गोकुळ मधील भ्रष्ट कारभाराबाबत दूध का दूध और पाणी का पाणी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासक आल्यानंतर जी चौकशी होईल ते सत्य समोर येईल. गोकुळच्या निवडणुकीत आता ठराव धारक विचार करतील आपण कोणासोबत राहायचं आहे. त्याच त्याच संचालकांसोबत राहायचं की घराणे शाही सोबत राहायचं हे ठराव धारक विचार करतील, असेही आमदार पाटील म्हणाले.

Tukaram Mundhe
Tukaram Mundhe : चार्ज घेण्यापूर्वीच तुकाराम मुंढेंची बदली : आईच्या निधनामुळे गेले होते रजेवर, IAS विनिता सिंघल यांची पुनर्नियुक्ती

FAQs :

1. गोकुळ प्रकरणात वाद का वाढला आहे
राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे वाद तीव्र झाला आहे

2. ED चौकशीची मागणी कोणी केली आहे
आमदार शिवाजीराव पाटील यांनी ही मागणी केली आहे

3. कोणत्या नेत्यांवर चौकशीची मागणी आहे
अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील यांच्यावर चौकशीची मागणी करण्यात आली आहे

4. प्रशासक म्हणून कोणाचे नाव सुचवले आहे
तुकाराम मुंडे यांचे नाव प्रशासक म्हणून पुढे केले आहे

5. या वादाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो
गोकुळ निवडणुकीवर आणि स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com