Kolhapur News, 29 May : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. मागील महिना-दीड महिन्यांपासून आरोप प्रत्यारोपाने गाजत असलेली गोकुळच्या निवडणूकीला या प्रक्रियेमुळे गती आली आहे.
महायुती म्हणून एकत्र लढायचा बेत ठरल्यानंतर गोकुळच्या माजी संचालकांनी कर्नाटकात असणाऱ्या डोंगरावर जाऊन देवाच्या साक्षीने शपथा घेतल्या. देवासमोर नतमस्तक झाले. इतकेच नव्हे तर उपस्थित असलेल्या सात ते आठ संचालकांनी एकत्र राहण्याच्या पुन्हा शपथा घेतल्या. शिवाय सीमेला लागून असलेल्या एका फार्म हाऊसवर नेत्यांच्या उपस्थितीत मेजवानी केली.
निवडणुकीचा सर्व बेत फायनल झाला. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये महायुतीतील दोनच पक्षाचे माजी संचालक होते. गोकुळच्या रणसंग्रामाचा नारळ फुटला आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचे ठरले आहे. त्यामुळे विरोधात कोण असण्यापेक्षा एकत्र राहण्यावर महायुती भर देणार आहे. शिवाय सध्या गोकुळ दूध संघाकडे ठरावाची मागणी दुग्ध निबंधक विभागाने केली आहे.
त्या ठरावांवर चर्चा करण्यासाठी गोकुळच्या माजी संचालकांनी शेजारच्या राज्यात असणाऱ्या एका डोंगरावर जाऊन महाराजांसमोर शपथ घेतली. या संचालकांचे नेत्यांचा येथील महारांजावर प्रचंड विश्वास आहे. नेत्यांनी सर्व संचालकांना एकत्रित ठेवण्यासाठी शहरापासून जवळच असलेल्या कर्नाटक रोडवरील एका डोंगरावरील मंदिरात काल रात्री सर्व जण एकत्रित केले. येथे त्यांनी यापूर्वीप्रमाणेच येथून पुढेही एकत्रित राहण्याची शपथ घेतली.
गतवेळच्या निवडणुकीनंतर यातील संचालक याच डोंगरावर जावून अशीच शपथ घेऊन आले होते. आता पाच वर्षे संपली आहेत. पूर्वीप्रमाणेच पुढील वाटचालीसाठी येथून सुरुवात केली आहे. रात्री येथे देवदर्शन झाल्यानंतर सर्व संचालकांसाठी कोगनोळी नाक्यावरील एका फार्महाउसवर मेजवानीचे नियोजन होते. तेथे नेत्यांसह सर्व जण पोहचले.
येथे उशिरापर्यंत निवडणुकीच्या नियोजनावर चर्चा झाली. कोणी कोणती जबाबदारी घ्यायची, साधारण किती ठराव मिळतील, यासाठी काय 'फिल्डिंग' लावायची याबाबतची सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. याला काहींनी दुजोराही दिला. 'गोकुळ' निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामध्ये सत्ताधारी आता महायुती म्हणून रिंगणात असणार आहेत. त्यामुळे भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, अशा तीनही आघाड्यांतील उमेदवारांना संधी द्यावी लागणार आहे.
संचालक मंडळांची संख्या वाढविली असली, तरीही विद्यमान कोण कोण रिंगणात राहणार, बदल कोणत्या ठिकाणी करायचा आहे, याबाबत गोपनीय चर्चा झाल्याचे समजते. नेत्यांकडून सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले. कोणत्या तालुक्यात कोणी ठरावाबाबत आग्रही भूमिका घ्यायची, यावेळी सुपरवायझरचा आधार घेता येणार नाही. मात्र, तेथे समांतर यंत्रणा कोणती राबवायची, ती कोणी राबवायची याबाबतही नियोजन सुरू झाल्याची माहिती पुढे येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.