Mosam River Pollution : ड्रोन, पोलीस बंदोबस्त, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा तरीही ईदनंतर मालेगावची मौसम नदी पुन्हा लाल! 3 अधिकारी निलंबित

Mosam River turns red after Eid in Malegaon: मालेगाव शहरातील बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध कत्तल रोखण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी शहरभर पोलिसांनी ड्रोन सोडले होते. या कडे कोट बंदोबस्तानंतरही समस्या सुटली नाही. बकरी ईदच्या कत्तलीमुळे गटारिंतून रक्तमिश्रित पाणी थेट मौसम नदीत मिसळले.
Malegaon Illegal Slaughterhouses | Mosam River Pollution
Blood-mixed water flowing into the Mosam River in Malegaon sparked protests against illegal slaughterhouses and rising river pollution concerns.Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon News, 29 May : अवैध कत्तलखाने हा मालेगाव शहराचा गंभीर प्रश्न बनला आहे. गेल्या आठवड्यात मौसम नदीत रक्तमिश्रित पाणी वाहिले होते. त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. शहरातील अवैध कत्तलखान्यांमुळे नदीत थेट रक्तमिश्रित पाणी मिसळते. गेल्या आठवड्यात त्यावरून नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते.

या पार्श्वभूमीवर बकरी ईदसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष दक्षता बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापालिका प्रशासनाने वाढीव कत्तलखाने सुरू केले होते. पोलिसांनी शहरभर बंदोबस्त तैनात करून अवैध कत्तल थांबविण्याची व्यवस्था केली होती.

मालेगाव शहरातील बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर अवैध कत्तल रोखण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी शहरभर पोलिसांनी ड्रोन सोडले होते. या कडे कोट बंदोबस्तानंतरही समस्या सुटली नाही. बकरी ईदच्या कत्तलीमुळे गटारिंतून रक्त मिश्रित पाणी थेट मौसम नदीत मिसळले. मौसम नदीतून हे पाणी गिरणा नदी द्वारे परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित करते. त्यामुळे नागरिकांमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

Malegaon Illegal Slaughterhouses | Mosam River Pollution
Maratha Reservation : "मला नाही वाटत ते उपोषणाला बसतील..."; जरांगेंच्या भेटीसाठी निघालेल्या मंत्री विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

गेल्या आठवड्यात या विरोधात सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी उपोषण केले होते. काल पुन्हा मौसम नदी लाल झाल्याने नागरिक संतापले. सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे बोरसे यांनी पुन्हा आंदोलन केले. त्याला मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, देवा पाटील, मराठा महासंघाचे भरत पाटील, मच्छिंद्र शिर्के यांसह विविध नेत्यांनी पाठिंबा दिला.

Malegaon Illegal Slaughterhouses | Mosam River Pollution
MLC Election : नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे खंदे समर्थक आज अर्ज घेणार, शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंची कोंडी

मालेगाव शहरातील मौसम नदीचे प्रदूषण हा राजकीय मुद्दा बनला आहे. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी गेल्याच आठवड्यात त्याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे काल प्रशासनाने कठोर भूमिका घेत चौकशीचे आदेश दिले. महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव, स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त अनिल पारखे, प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com