

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत ३० मे पासून कठोर भरउन्हात आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. जरांगेंच्या या पत्रकार परिषदेनंतर सरकारच्या पातळीवर मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे यांची भेट घेण्यासाठी अंतरवाली सराटीत जाणार आहेत. या भेटीला जाण्यापूर्वी विखे पाटील यांनी "माझाशी चर्चा केल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील", असा विश्वास व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, "मराठा आरक्षणा संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे, मागच्या वेळी हैद्राबाद गॅजेटची अंमलबजावणी आणि ज्या काही उणिवा आहेत, त्या संदर्भात आज जरांगे पाटलांशी चर्चा करणार आहोत. या भेटीत त्यांचे काही गैरसमज असतील तर ते दूर करू.
आम्ही अंमलबजावणी प्रभावीपणे केलेली आहे. काही कायदेशीर बाबी उपस्थित झाल्यामुळे विलंब होतो. मात्र त्यातही प्रयत्न सुरू आहेत. जरांगे यांचा काही गैरसमज झाला आहे. मी आज त्यांना वस्तुस्थिती सांगेन. माझाशी चर्चा केल्यानंतर मला वाटत नाही ते उपोषणाला बसतील" असं विखे म्हणाले.
शिवाय राज्यात 58 लाख कुणबी नोंदी निघाल्या, अडीच लाखांपेक्षा जास्त दाखले दिलेले आहेत. तसंच सातारा गॅजेटबाबत काही अडचणी आहेत. या अडचण सांगितल्यानंतर ते सातारा गॅजेटसाठी आग्रही राहतील, असं मला वाटत नसल्याचंही ते म्हणाले.
मात्र, दुसरीकडे जरांगे पाटील मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी आपण सरकारला दहा महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे आता चर्चा नको निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आज विखे यांच्या भेटीनंतर जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेणार? ते आंदोलन मागे घेणार की आंदोलन करणाऱ्यावर ठाम राहणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.