Gokul Dudhsang 2026 Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur : 'गोकुळ'वर कब्जासाठी मुश्रीफांचा गुरुवारी 'पॉवर शो' : शिवसेना, भाजपही एकाचवेळी दाखवणार ताकद; सतेज पाटलांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन

Gokul Milk Union Election, Gokul Resolution Filing, Kolhapur Politics: गोकुळ दूध संघ निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आल्याने राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. अधिक ठराव मिळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Rahul Gadkar

Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रक्रियेतील ठराव दाखल करण्याचा टप्पा टप्पा जवळ आलेला आहे. २ जुलै रोजी ठराव दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. अशात २६ जून ते २८ जून रोजी सुट्टी असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये ठराव दाखल करण्याची लगबग सुरू झाली आहे. ज्याच्याकडे अधिक ठराव त्याला महायुतीत अधिकच्या जागा शिवाय विजयाचा दावेदार असं समीकरण असल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. त्यामुळे शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल करून गोकुळ मधील आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांचा आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावाला अधिक महत्त्व आहे. गेल्या 15 दिवसांपासून संस्था सभासदांचे ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. अशातच उद्या (२५ जून) मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे घटक पक्षाचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ताराबाई पार्क येथील दुग्ध निबंधक कार्यालयाकडे ठराव जमा केले जाणार आहेत. संस्था प्रतिनिधी, अनुमोदक यांनाच ठराव दाखल करताना उपस्थित राहणे बंधनकारक केले असताना महासैनिक दरबार हॉल येथे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ठरावधारक एकत्र येणार आहेत. शक्ती प्रदर्शन करत हे ठरावधारक दुग्ध निबंध कार्यालयाकडे रवाना होणार आहेत. आणि त्या ठिकाणी केवळ दोनच व्यक्तींमध्ये हे ठराव दाखल होणार आहेत.

दरम्यान २६ जून रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती, २७ जून रोजी शनिवार आणि २८ जून रोजी रविवार असल्याने तीन दिवस सुट्टी असणार आहे. त्यामुळे २९ जूनला शिवसेनेकडून शक्तिप्रदर्शन करत ठराव दाखल केले जाणार आहेत. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदिप नरके, माजी खासदार संजय मंडलिक हे उपस्थित असणार आहेत. त्याचवेळी भाजपकडूनही २९ जूनला शक्तिप्रदर्शन करत ठराव दाखल होणार आहेत. यावेळी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती असणार आहे.

तर ३० जून रोजी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा गट शक्तीप्रदर्शन करत ठराव दाखल करणार आहे. वैशिष्ट म्हणजे अनेक धक्कादायक चेहरे यावेळी उपस्थित असणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT