Devendra Fadnavis Hasan Mushrif .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Politics: 'गोकुळ'चा प्लॅन ठरला? मुख्यमंत्री फडणवीस अन् मंत्री मुश्रीफांची गुप्त भेट, भाजप अंतर्गत 'अदृश्य' विरुद्ध 'गूढ' शक्ती अ‍ॅक्टिव्ह

Kolhapur News: भाजप पक्षांतर्गत सुरू असलेले मतभेद, शिवाय अदृश्य शक्ती विरुद्ध गूढ शक्ती अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. त्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण देखील तितकच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज फडणवीस यांच्या बैठकीत गोकुळ दूध संघामध्ये महायुतीला कोणत्या आधारे जागावाटप होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमध्ये सुरू असलेला घटक पक्षांतर्गत संघर्ष अद्यापही सुरूच आहे. अशातच स्थानिक पातळीवर घेण्यात आलेल्या दोन्हीही बैठका निष्फळ ठरल्या. अखेर जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला. मात्र, मागील दोन दिवसातील गुप्त हालचाली आणि घडामोडी पाहता बुधवारी(ता.30) त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

भाजप पक्षांतर्गत सुरू असलेले मतभेद, शिवाय अदृश्य शक्ती विरुद्ध गूढ शक्ती अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. त्याला मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचं कारण देखील तितकच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज फडणवीस यांच्या बैठकीत गोकुळ दूध संघामध्ये महायुतीला कोणत्या आधारे जागावाटप होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनिमित्ताने भाजप अंतर्गत वाद देखील तितकाच कारणीभूत आहे. महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात सुरुवातीला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. त्यामुळे पक्षांतर्गत कुजबुजीमुळे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही काळापुरतं गोकुळच्या राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली होती.

सध्या ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपच्या काही नेत्यांकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. मात्र सातत्याने मंत्री मुश्रीफ ही निवडणूक व्हावी यासाठी आपली भूमिका ठाम ठेवून आहेत. या कारणावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे सांगितले जाते. इतकेच नव्हे तर महायुतीची स्थानिक पातळीवर दोन वेळा बैठक झाली. या बैठकीला आमदार शिवाजी पाटील यांची उपस्थिती का नव्हती? याचे गूढ कायम आहे.

कोणत्याही परिस्थितीत स्थानिक पातळीवर जागा वाटप सूत्र ठरले जाऊ नये,याची तंतोतंत काळजी अदृश्य शक्तीने घेतल्याचे दिसून येत आहे. हे जागावाटप पक्षीय पातळीवर होण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत वास्तव पोहोचवण्याचा प्रयत्न अदृश्य शक्तीकडून करण्यात आला. त्यामुळे रेंगाळलेल्या महायुतीचा गुंता सोडवण्यासाठी पुन्हा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आली.

मात्र, मंत्री पाटील यांच्यावर दिलेली जबाबदारी भाजपमध्येच काहींना खटकल्याचे सांगितले जाते. कार्यालयात वरिष्ठाकडून शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी तिथून जाने पसंत केले. त्यामुळे रविवारी झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद देखील उमटले. विधानसभा निवडणुकीप्रमाणे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये देखील जुना नवा कार्यकर्त्यांचा वाद देखील तितकाच कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

तर मंत्री हसन मुश्रीफ हे सातत्याने अदृश्य शक्तीच्या विरोधात न्यायालयीन लढाईत दिसले. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेली माहिती ही एक बाजू होती. मात्र दुसरी बाजू पोहोचवण्यासाठी याच गूढ शक्तीने पुढाकार घेतल्याची माहिती समोर येत आहे. गणेश उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेली गुप्त भेट याचाच एक भाग होती. या बैठकीत महायुती म्हणून आपण एकत्र कसे लढू शकतो? याचा संपूर्ण प्लॅन मंत्री मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला

त्यानंतरच महायुतीमध्ये समन्वय घडवण्याची जबाबदारी थेट मंत्री पाटील यांच्यावर सोपवण्यात आली. शिवाय अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री यानिमित्ताने अदृश्य शक्तीला कंट्रोलमध्ये ठेवले. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहेत.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री काय निर्णय देणार हे महत्त्वाचे आहे. शिवाय अदृश्य शक्ती, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना जनसुराज्य या पक्षांना किती सन्मान मिळणार? यावरच त्या गूढ शक्तीचा गोकुळच्या राजकारणात किती परिणाम झाला हे समोर येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT