Sangli Bank Election : भाजपला झाली 'ZP'तील जिव्हारी लागणाऱ्या पराभवाची आठवण; जिल्हा बँकेची निवडणूकीचे महायुतीसमोर चॅलेंज...

Sangli District Central Cooperative Bank, Mahayuti Sangli, Mahayuti seat sharing : भाजपकडून कोणाला संधी दिली जाईल, कोणाला माघार घ्यावी लागेल, माघार घेतलेला पदाधिकारी महायुती सोबत राहील का? अशा विविध प्रश्नावर भाजपला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
Sangli District Bank Chandrakant Patil
Sangli District Bank Chandrakant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP Sangli news : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणुक अंतिम टप्प्यात आली असताना महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि संशयाची सुई अजून कायम आहे. भाजप कडून ही निवडणूक महायुती म्हणून लढण्याचे जाहीर केले असले तरी अजूनही भाजप व घटक पक्षातील चित्र संशयास्पद आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच भाजप पदाधिकाऱ्यांना दम भरला आहे.

पॅनेलची जुळवाजुळव करताना भाजपसमोर केवळ विरोधकांचेच आव्हान नसून पक्षांतर्गत इच्छुकांच्या अडचणींचा मोठा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीत झेडपी पॅटर्नची धास्ती निर्माण झाली आहे.

महायुतीची सत्ता आल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये भाजपच्या भूमिकेमुळे घटक पक्षांमध्ये देखील नाराजी होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घटक पक्षाने भाजपला जागा दाखवण्यासाठी स्थानिक पातळीवर सोयीस्कर निर्णय घेतले. विरोधक महाविकास आघाडीला घटक पक्षांची साथ मिळाल्याने भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

Sangli District Bank Chandrakant Patil
Rajya Sabha Candidate : वडील भाजपच्या पाठिंब्यावर खासदार, आता लेकाला काँग्रेसच्या मित्रपक्षाकडून तिकीट; 'NDA'ची कोंडी

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही असेच घडत असल्याची माहिती आता समोर येत आहे. भाजपच्या बैठकीत याबाबत एका पदाधिकाऱ्याने भाकीत करत खळबळ उडवून दिली. आपल्या पक्षातीलच काहीजण स्वतःची जागा वाचवतील, त्याचा फटका पक्षाच्या अधिकृत पॅनेलला बसेल, अशी भीतीही भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षाच्या बैठकीत मांडली आहे.

यापार्श्वभूमीवर भाजपकडून कोणाला संधी दिली जाईल, कोणाला माघार घ्यावी लागेल, माघार घेतलेला पदाधिकारी महायुती सोबत राहील का? अशा विविध प्रश्नावर भाजपला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. भाजपने जिल्हा बँकेसाठी तयारी सुरू केली असून महायुतीतील घटक पक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. महायुतीच्या माध्यमातून पॅनेल उभे करायचे, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, जागावाटप आणि उमेदवारीची समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत.

Sangli District Bank Chandrakant Patil
Gyanesh Kumar news : ज्ञानेश कुमारांच्या बैठकीची ऑडिओ टेप येणार बाहेर? राजकीय पक्षाने उडवून दिली खळबळ

दरम्यान, भाजप आणि महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही विद्यमान संचालकांनी पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मात्र, महायुती आणखी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे काही संचालकांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्थानिक पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाकडे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांची वेट अँड वॉच ची भूमिका आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com