INDIA Meeting: INDIA आघाडीकडून 'लोकशाही वाचवा' आंदोलनाची घोषणा! ज्ञानेश कुमारांचा राजीनामा ते दिल्लीत भव्य आंदोलन; 6 कलमी कार्यक्रम जाहीर

INDIA Bloc Meeting : राजधानी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून येत्या काळात विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घाम फोडणार आहेत.
Mallikarjun Kharge at INDIA Bloc
Mallikarjun Kharge at INDIA BlocSarkarnama
Published on: 
Updated on: 

INDIA Bloc Meeting : राजधानी दिल्लीच्या कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून येत्या काळात विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरुन घाम फोडणार आहेत. या बैठकीत प्रामुख्यानं देशभरात निवडणूक आयोगाकडून सुरु असलेल्या SIR प्रक्रियेमधील कथित घोटाळ्यांवर चर्चा झाली. त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर लोकशाही वाचवा आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून येत्या काळात दिल्लीत यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं बैठकीनंतर पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं.

तीन तास चालली बैठक

इंडिया आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना आघाडीचे समन्वयक आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं की, २० पक्षांनी मिळून या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या बैठकीत तीन ते साडेतीन तास चर्चा पार पडली, या चर्चेत सर्वच पक्षांनी सहभाग नोंदवला अनेक नेत्यांनी यामध्ये आपले विचार मांडले. तसंच ऑनलाईन पद्धतीनं या बैठकीत उद्धव ठाकरे आणि हेमंत सोरेन हे सहभागी झाले होते. मला आनंद आहे की सर्वांनी यामध्ये एकजूट होऊन लढाई लढण्याची बाब मांडली. यामध्ये अनेक प्रकारच्या सूचना ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांनी दिल्या.

Mallikarjun Kharge at INDIA Bloc
Uddhav Thackeray: INDIA आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे बरसले! काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत दिला महत्वाचा सल्ला

आयोगाला कठपुतली प्रमाणं खळवलं जातंय

सर्वांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या एकत्रिक करुन देशात सध्या निवडणूक आयोगाविरोधात आणि विशेषतः आयोगाला कठपुतलीप्रमाणं खेळवलं जात आहे, त्याविरोधात आवाज उठवला जाणार आहे. पंतप्रधान मोदींकडून निवडणूक आयोगाला खेळवल जात आहे असा गंभीर आरोपही यावेळी खर्गे यांनी केला. प्रत्यक्षात मोदी निवडणूक आयोगाकडून मतांची चोरी करत आहेत. चोरी करुन निवडणुका जिंकत आहेत, याविरोधात आमची नेते मंडळी लोकशाहीसाठी, तरुणांसाठी जे न्यायपूर्ण लढाई लढत आहेत, त्यांनाही त्रास देण्याची आणि उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. याबाबत काय करायला हवं काय केलं पाहिजे याबाबत मी तुम्हाला सांगू इच्छितो.

सेव्ह डेमोक्रसी मोर्चा

यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे आम्ही देशातील लोकांना, तरुणांना आणि इंडिया आघाडीच्या लोकांना, तसंच एनजीओ, जे संविधानाच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत, ज्यांना लोकशाहीत आस्था आहे त्यांनी इंडिया आघाडीच्या या कार्यक्रमात सहभागी व्हावं. त्यानुसार, २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जिल्हा स्तरावर 'सेव्ह डेमोक्रेसी' मोर्चा करायचे आहेत. तसंच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करायचं आहे तसंच जनतेला देखील याबाबत जागृती निर्माण करायची आहे, असं सांगताना खर्गेंनी या बैठकीत ठरलेले ६ कार्यक्रम जाहीर केले.

Mallikarjun Kharge at INDIA Bloc
Someshwar Sugar Election : सोमेश्वरच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोड, विद्यमान अध्यक्षांचेच बंड; राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का

खासदारांचा मोर्चा

दुसरा कार्यक्रम म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी सर्व विरोधी खासदार मग ते लोकसभेतील, राज्यसभेतील असतील हे सर्व सहभागी होऊन निवडणूक आयोगावर एक भव्य मोर्चा काढणार आहेत.

विरोधीपक्ष नेत्यांकडून राष्ट्रपतींची भेट

तीसरा कार्यक्रम आहे की, विरोधीपक्ष नेत्यांकडून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपतींना एका शिष्टमंडळाद्वारे भेट दिली जाणार आहे. यामध्ये आम्हाला ज्या अडचणी येत आहेत तसंच संविधानात्मकदृष्ट्या सरकार ज्या अडचणी निर्माण करत आहे. तसंच लोकांना त्रास देऊन चोरीचं सरकार चालवत आहेत, त्याविरोधात आम्ही राष्ट्रपतींसमोर आमची बाजू मांडणार आहोत.

देशभरात ५ मोठ्या रॅली काढणार

चौथा कार्यक्रम म्हणजे आम्ही ५ मोठ्या रॅली काढणार आहोत, पण त्याबाबत तारीख आणि दिवस नंतर जाहीर केला जाईल. या रॅलीद्वारे आम्ही देशातील जनतेला सांगणार आहोत की, कशा प्रकारे आजचं सरकार लोकांची मतं चोरत आहेत. त्यांचे अधिकार ओरबाडून घेत आहे, तसंच देशाला वाचवण्याचा अधिकार, सरकार चालवण्याचा अधिकार तसंच देशाला वाचवण्याचा अधिकार काढून घेतला जात आहे यापासून राष्ट्रपतींना अवगत करण्यासाठी आम्ही ५ मोठ्या रॅली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढणार आहोत.

दिल्लीत मोठी रॅली काढणार

पाचवा कार्यक्रम म्हणजे दिल्लीत मोठी रॅली काढली जाईल यामध्ये मतचोरी आणि राहुल गांधींनी यापूर्वी अनेक गोष्टी पहिल्यापासून सांगितल्या आहेत, त्या पुन्हा उपस्थित केल्या जाणार आहेत. पण राहुल गांधी आधी बोलत होते ते योग्यच होतं हे आता सर्वांना कळतं आहे. पण आमच्या गोष्टींकडं लोक आणि माध्यमं आकर्षित होत नव्हते पण आता लोकांना या गोष्टी कळत आहेत. त्यामुळं मोदींचा खोटेपणा त्यांच्या लक्षात येत आहे. आधी नोटबंदी केली त्यानंतर आता वोटबंदी करुन ते लोकांचे अधिकार हिसकावून घेत आहेत.

Mallikarjun Kharge at INDIA Bloc
Ahilyanagar DCC Bank Election : पालकमंत्री विखेंनाच बैठकीची माहिती नसेल तर बिनविरोध कशी? राम शिंदेंच्या सवालांनी महायुतीत चलबिचल

निवडणुकीसंदर्भातील कोर्ट खटले निकाली काढा

यानंतर सहावा कार्यक्रम म्हणजे आम्ही सर्व इंडिया आघाडीचे नेते हे आवाहन करतो की, सुप्रीम कोर्टात जेवढे केसेस आहेत त्यांना एकत्रित केलं पाहिजे. यामध्ये SIR आणि निवडणुकीच्या घोटाळ्यांच्या केसेस आहेत त्या लवकरात लवकर निपटल्या पाहिजेत. कारण त्या जर अशाच लटकून राहिल्या तर त्यामुळं जनतेचं नुकसान होणार आहे. या आमच्या सहा मुद्द्यांचा कार्यक्रम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com