Gokul Mahayuti Politics 
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Politics: मुश्रीफांचा राग, कोरेंची मध्यस्ती, महाडिकांचा खुलासा अन् चंद्रकांत पाटलांचा तोडगा; गोकुळ महायुतीच्या बैठकीतली Inside Story जाणून घ्या

Gokul Politics: गेल्या दोन महिन्यांपासून आरोप प्रत्यारोपाने गाजणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरु असलेल्या महायुतीतील वादाला आज पूर्णविराम मिळाला.

Rahul Gadkar

Gokul Politics: गेल्या दोन महिन्यांपासून आरोप प्रत्यारोपाने गाजणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून सुरु असलेल्या महायुतीतील वादाला आज पूर्णविराम मिळाला. गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणून एकत्र लढवण्याची घोषणा आज महायुतीतील नेत्यांनी एकत्रपणे केली. इतकेच नव्हे तर निवडणुकीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी या पॅनलची घोषणा करण्यात आली. या संदर्भातील बैठक आज एका ठिकाणी गुप्तपणे पार पडली. पण या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा राग, त्यावर आमदार विनय कोरे यांचे मध्यस्थी, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडून खुलासा आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार आज गोकुळ निवडणुकीच्या संदर्भात कोल्हापूरातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार विनय कोरे आणि जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीलाच गोकुळवरून महायुतीत सुरु असलेल्या प्रकारावर घमासान झालं. मंत्री मुश्रीफ यांनी महायुतीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. गोकुळ मधील चौकशी आणि प्रशासक यावरून रोष व्यक्त केला. "प्रशासक निवडत असताना मला यादी का दाखवण्यात आली नाही? मी महायुतीचा घटक नाही का? असा सवाल मंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित करत खंत व्यक्त केली.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्याकडून देखील काही गोष्टीवर खल व्यक्त करण्यात आले. मात्र गोकुळ मधील चौकशी करणाऱ्यांच्या पाठीशी कोण आहे. याबाबत आम्हाला कल्पना नाही. आजपर्यंत महायुती म्हणून आम्ही गोकुळच्या एकाही प्रकरणावर भाष्य केलं नसल्याचा खुलासा महाडीक गटाकडून करण्यात आला.

त्यावर आमदार विनय कोरे यांच्या मध्यस्थीने महायुतीमधील नेत्यांचा समन्वय राखून ही बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही बैठक होत असून महायुती म्हणून या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जाऊ या. झाले गेले विसरून, जे झालं ते पाठीवर टाकून महायुती म्हणून एकत्र लढू या. मागील गोष्टीवर कोणतीही चर्चा न करता निवडणूक एक संघ लढू या. असे आमदार विनय कोरे यांनी स्पष्ट केले.

अखेर चर्चेला पूर्णविराम देताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या बैठकीतील तोडगा काढला. बैठकीत जागा वाटपाची चर्चा झाली नसली तरी जागा वाटपाचे सूत्र कसे असावे? यावर चंद्रकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. ज्यांच्याकडे जसे ठराव येतील त्यावर जागा वाटप करण्याची प्राथमिक चर्चा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. महायुतीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागा वाटपाबाबत निर्णय घेतील, असे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी देखील महायुती म्हणून एकत्र लढूया असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT