Indian Army news : भारतीय लष्कराचा पाकिस्तानला कडक इशारा; काही सीमा कधीच ओलांडायच्या नसतात, भारत...

Pahalgam attack : भारतीय लष्कराकडून सोशल मीडियात ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
Indian Army
Indian ArmySarkarnama
Published on
Updated on

India Pakistan tension news : मागील वर्षी २२ एप्रिलला पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करत २६ जणांची हत्या केली होती. या अमानुष हल्ल्याने भारतासह संपूर्ण जग हादरले होते. भारतानेही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धस्त करत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पहलगाम हल्ल्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय लष्कराने पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे.

पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धार्मिक ओळखीच्या आधारावर पर्यटकांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यात मृत्यू झालेले पर्यटक पुरूष होते. त्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेत त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडविली होती. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराने सूचक इशारा दिला आहे.

भारतीय लष्कराकडून सोशल मीडियात ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘मानवतेच्या सीमा ओलांडल्या गेल्या की त्याचे प्रत्युत्तरही निर्णायक असते. न्याय मिळाला आहे. भारत एकजुट आहे.’ पोस्टमध्ये लष्कराने एक फोटो पोस्ट करत त्यावर म्हटले आहे की, ‘काही सीमा कधीच ओलांडायच्या नसतात. भारत कधीच विसरत नाही.’ 

Indian Army
Maharashtra Government : मोठी बातमी : सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून संप; राज्य सरकारने रजा, वेतन अन् कारवाईबाबत काढले आदेश

लष्कराकडून या पोस्टमध्ये पाकिस्तान किंवा दहशतवादाचा उल्लेख केला नसला तरी हा अप्रत्यक्षपणे पाकला इशारा मानला जात आहे. ऑपरेशन सिंदूरची आठवण करून देणारी ही पोस्ट भारतीय लष्कर अजूनही सज्ज असल्याचा स्पष्ट इशारा मानला जात आहे. त्यामुळे या पोस्टला महत्व प्राप्त झाले आहे.

Indian Army
Modi Government news : PM मोदींचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागलेल्या नेत्यावर देशाची मोठी जबाबदारी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष झाला होता. यामध्ये भारतीय लष्कराने पाकला चांगलीच अद्दल घडविली होती. दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासोबतच पाक लष्कराच्या काही तळांनाही टार्गेट करण्यात आले होते. त्यामुळे पाक लष्कराचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पाकने माघार घेत शस्त्रसंधीसाठी गयावया केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com