Gokul's annual meeting
Gokul's annual meeting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Annual Meeting : गोकुळच्या वार्षिक सभेला गोंधळातच सुरुवात; शौमिका महाडिकांनी घेतली ही भूमिका

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : आमच्या ठरावधारकाला बसायला जागा नसेल तर मीही व्यासापीठावर जाणार नाही, मीही उभी राहूनच प्रश्न विचारेन, अशी भूमिका महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी घेतली आहे. कोल्हापूर (kolhapur) जिल्हा सहकारी दूध संघाची (गोकुळ, Gokul) सर्वसाधारण सभेसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बसायाच्या खुर्च्यावरून जुंपली आहे. (Gokul's annual meeting begins with chaos)

कोल्हापूर माजी पालकमंत्री सतेज पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, तूराज पाटील यांच्या उपस्थितीत गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला कोल्हापुरात सुरुवात झाली आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या सभा हेात आहे. अपेक्षेप्रमाणे गोकुळच्या या वार्षिक सभेला प्रचंड गर्दी झाली आहे. गोकूळची सभा ही नेहमीच वादळी ठरत असते. या पूर्वी सभेत खुर्च्याची फेकाफेकी, बाटल्या फेकून मारणे, असे प्रकार घडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

दरम्यान, आम्ही येण्याअगोदरच्या आमच्या जागेवर कोण येऊन बसले आहे, याची चौकशी करा. आम्हाला आमची जागा मिळाली पाहिजे, अशी मागणी शौमिका महाडिक यांनी केली आहे. आमच्या ठरावधारकांना बसायला जागा मिळत नसेल तर मीही व्यासापीठावर जाऊन बसणार नाही. आमच्या ठरावधारकांना आणि सभासदांना बसायला हक्काची जागा मिळावी, अशी भूमिका शौमिका महाडिक यांनी घेतली आहे. आमचे प्रश्न तिखट स्वरुपाचे आहेत. सत्ताधारी पक्षांना झोंबणारे असेच आमचे प्रश्न आहेत. त्यांच्याकडून योग्य उत्तरे मिळाली नाही तर आम्ही सभागृहाच्या बाहेर समांतर सभा आयोजित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT