GoodNews
GoodNews Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयसिंगपूर शहरात झळकले 'गुड न्यूज आहे'चे फलक!

सरकारनामा ब्यूरो

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : जयसिंगपूर शहरात जागोजागी लागलेले ‘गुड न्यूज आहे'चे डिजिटल फलक शहरात चर्चेचे विषय बनले आहेत. शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे फलक कोणी लावले? हे कोणालाच माहीत नसले तरी त्याचे संदर्भ आपापल्या परीने लावले जात आहेत. ('Good News' billboards flashed in Jaysingpur city)

राजकीय फलकांची जागा आता 'गुड न्यूज आहे' या अनाकलनीय फलकांनी घेतल्याने नागरिकांची उत्सुकताही ताणली गेली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्याच्या राजकारणात ट्विस्ट आला असताना अशा काळात हे फलक कोणते सूचक विधान तर करत नाही ना, असाही सूर शहरात उमटू लागला आहे.

जयसिंगपूर शहरात एका रात्रीत 'गुड न्यूज' वाले फलक लागले आहेत. सकाळी नागरिकांना याचा कोणताच अर्थबोध झाला नाही. राजकीय फलकांच्या राखीव जागेवर हे फलक लागल्याने त्यावरून सध्या शहरात चर्चेचे रान उठले आहे. शहरात कोणत्या कंपनीचे मोठे शो रूम तर होत नाही ना कि शहरात नवीन काही जाहिरातबाजी करण्यापूर्वीचा हा फंडाही नाही ना, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

पितृ पंधरवड्यात असे नवीन काही होईल याची शक्यताही नसताना 'गुड न्यूज' फलकांनी शहरात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ तालुक्यातील राजकारण नव्या वळणावर पोचले आहे. सोशल मीडियावर आव्हाने दिली जात असताना जयसिंगपूर शहरातील हे फलक जिल्हा बँकेच्या सूचक घडामोडींकडे लक्ष वेधत आहेत. 'गुड न्यूज'चा खुलासा होणारे फलक उभारणार का आणि त्याचे संदर्भ काय असतील, याची उत्सुकता शहरात ताणली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT