राष्ट्रवादीचा शिवसेनेला पुन्हा दणका : माजी आमदार कैलास पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

राज्यात महाविकास आघाडी असली तरी आगामी काळात काय होईल, हे सांगता येत नाही, त्यामुळे आपण आपली तयारी करावी.
Former Shiv Sena MLA Kailas Patil joins NCP
Former Shiv Sena MLA Kailas Patil joins NCPSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : चोपड्याचे शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील आणि शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हाप्रमुख इंदिरा पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज (ता. २५ सप्टेंबर) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या राष्ट्रवादीने मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला खिंडार पाडत त्यांचा आणखी एक नेता फोडला आहे. भुजबळ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. (Former Shiv Sena MLA Kailas Patil joins NCP)

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशानंतर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मोठी होती. तब्बल सात आमदार होते. आता ही संख्या केवळ एकवर आलेली आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी आगामी काळात काय होईल, हे सांगता येत नाही, त्यामुळे आपण आपली तयारी करावी. आपले नेते शरद पवार आदेश देतील तो आपण स्वीकारू. मात्र, आपण पक्षाची ताकद वाढवून स्वबळाची तयारी करून प्रत्येक संस्थेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकवावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.

Former Shiv Sena MLA Kailas Patil joins NCP
काकडे गटाची मुलुखमैदानी तोफ प्रा. बाळासाहेब जगतापांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुजबळ म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. राज्यातील सद्याच्या परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, कुणी जास्त बोलले की लगेच त्याला अडचणीत आणले जात आहे. मात्र देशातील न्याय व्यवस्थेवर आमचा विश्‍वास आहे. दिल्लीच्या महाराष्ट सदन उभारणीचे काम १०० कोटींचे आणि गैरव्यवहाराचा आरोप ८५० कोटीचा केला जात होता. न्यायालयाने आमची यातून निर्दोष मुक्तता केली आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी सर्वच पक्ष एकत्र आल्याचा आनंद आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील यासंदर्भात सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने अध्यादेश काढूनही निवडणूक आयोग निवडणुका पुढे ढकलत नाहीये. त्यासाठी आम्ही सोमवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

Former Shiv Sena MLA Kailas Patil joins NCP
अजित पवारांची डोकेदुखी वाढली; भाजपचे राष्ट्रवादीच्या नाराजांवर लक्ष

या वेळी विधानसभेची माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, माजी आमदार संतोष चौधरी, उमेश नेमाडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहीणी खडसे, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मिक पाटील, राजेश पाटील, तिलोत्तमा पाटील, ज्ञानेश्वर महाजन, माजी आमदार दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, विकास पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com