Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil : लवकरच एक गोड बातमी मिळणार : जयंत पाटलांबाबत शिवसेना नेत्याचं मोठं भाष्य

Prakash Mahajan Statement : जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेचे प्रकाश महाजन यांनी ‘लवकरच गोड बातमी’ मिळणार असल्याचे म्हटले.

विश्वभूषण लिमये

Solapur, 19 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ते भेटले. या भेटीसाठी त्यांनी ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या कारवाईचे कारण सांगितले असले तरी राजकीय वर्तुळात या भेटीची वेगळीच चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी ‘लवकरच एक गोड बातमी मिळणार आहे,’ असे म्हटले आहे.

शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते प्रकाश महाजन हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांच्या ‘एनडीए’तील प्रवेशाबाबत भाष्य केले.

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हेही सोबत असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, जयंत पाटील यांनी त्याबाबत मौन बाळगले आहे. भेटीचे कारण त्यांनी ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेचे कारण दिलेले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यानंतर जयंतरावांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली आहे. या भेटीची छायाचित्रे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर अपलोड केली आहेत. त्यात त्यांच्यासोबत ईश्वरपूरचे अपात्र ठरलेले नगराध्यक्ष होते. शिवाय जयंत पाटील यांनीही तेच कारण सांगितले आहे.

दुसरीकडे, जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ते पद पाटील यांना कसे मिळणार, याची उत्सुकता आहे. त्यांना एकतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एनडीएमध्ये सामविष्ठ व्हावे लागणार आहे, त्याचीच चर्चा राज्यात सुरू आहे. त्याबाबत प्रकाश महाजन यांनी दावा केला आहे.

ते म्हणाले, मला देखील दिल्लीच्या मित्रांनी आत्ताच सांगितलं आहे की, लवकरच गोड बातमी मिळणार आहे. मीदेखील त्या गोड बातमीची वाट पाहत आहे. ‘एनडीए’मध्ये जे कोणी येतील, त्यांचं आम्ही स्वागतच करू.

अमित राज ठाकरे यांनी अगोदर स्पष्ट केलेलं होतं की, त्यांचा दीपके यांना नाही, तर सोनम वांगचुक यांना पाठिंबा आहे. मात्र, आज त्यांना अभिजीत दीपके यांच्या कानात बोलावं लागत आहे. पण, एखाद्या महाराष्ट्रातल्या तरुण नेत्याने अभिजीत दिपके यांच्याविषयी उघडपणे जे मत मांडलं, त्याचं मला कौतुक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT